मार्कंडेयनगर तसेच आजूबाजूच्या परिसरात वसलेली गावे ही धरणामुळे विस्थापित होऊन अनेक वर्ष झालेली आहेत. गेल्या पाच वर्षात ही गावे विकासापासून वंचित राहिली आहेत.
आगामी काळात कर्नाटकमध्ये भारतीय जनता पार्टीचे सरकार आल्यानंतर या भागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही बेळगाव ग्रामीण मतदारसंघाचे उमेदवार श्री. नागेश मनोळकर यांनी स्थानिक नागरिकांना दिली.
बेळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघ निवडणूक प्रचारार्थ आज मार्कंडेयनगर आणि शेजारील वड्या वस्त्यांवर नागेश मनोळकर यांनी भेट दिली. यावेळी श्री. धनंजय जाधव ( अध्यक्ष, भाजपा ग्रामीण मंडळ ) हे उपस्थित होते.
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ आज संतीबस्तवाड आणि मार्कंडेयनगरमध्ये भव्य रॅली काढण्यात आली होती. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज, कित्तूर राणी चन्नम्मा, थोर स्वातंत्र्यसेनानी वीर सिंदुर लक्ष्मण यांना अभिवादन करत सुरुवात झाली. रलीच्या माध्यमातून गावातील नागरिकांची भेट घेत परिसरातील विकासासाठी असणारा संकल्प नागरिकांपुढे मांडण्यात आला. यावेळी स्थानिक ग्रामस्थांनी भाजपा उमेदवार नागेश मनोळकर यांना पाठिंबा जाहीर केला.