स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रणेते राजू शेट्टी यांनी बेळगावात ऊस उत्पादक शेतकऱ्यांना भेटण्यासाठी आले होते. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना महाराष्ट्रात आताच्या घडीला पेटलेल्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर ही त्यांनी भाष्य केले.
महाराराष्ट्रात वर्षानुवर्षे मराठा समाज शेती करणारा असून जवळपास 95% लोक शेतकरी आहेत. परंतु वर्षानुवर्षे शेती करत असताना शेतकऱ्यांना अनेक तोट्यांना सामोरे जावे लागत , त्यामुळे यांची आर्थिक स्थिती बिघडली आहे.
मराठा समाजाला आरक्षणाची गरज असून त्यांना आरक्षण दिल्याशिवाय त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारणार नाही. तसेच त्यांच्या मुलांना शिक्षण व नोकरीच्या संधी उपलब्ध होणार नाहीत. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळावे अशी अपेक्षा व्यक्त केली.
महाराष्ट्राप्रमाणे कर्नाटकात सुद्धा लिंगायत समाजाची स्थिती असून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने लिंगायत समाजाला पाठिंबा दिला होता. तसेच हरियाणातील जाट समाजाला पाठिंबा दिला असल्याचं आणि त्याची मागणी ही पूर्ण झाली असल्याचे त्यांनी सांगितले.
आपल्या संविधानात आरक्षणाची तरतूद असून कोणत्याही राज्यातील आरक्षण 52% पेक्षा जास्त करता येत नाही म्हणून त्यात गॅप करणे आवश्यक आहे. जसे तामीळनाडूतील आरक्षणाचा मुद्दा 78% पर्यंत पोहचला तेव्हा सर्वोच्च न्यायालयाने ही मान्यता दिली होती. नेमका हाच मुद्दा आता मराठा आरक्षणा बाबतीत होताना दिसत आहे, यामुळे गॅप काढण्याची वेळ महाराष्ट्र सरकारवर आली आहे. तेव्हा सरकार यावर लवकरच उपाय शोधून मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी प्रयत्न करेल असे ही राजू शेट्टी यांनी सांगितले.