टोकिओ ऑलिम्पिक सुवर्ण पदक विजेता नीरज चोप्रा याने डायमंड लीगमध्ये उत्कृष्ट थ्रोसह वापसी केली आहे.
त्याने आपल्या पहिल्याच थ्रोमध्ये आपला मागील विक्रम मोडला आहे. स्टार एथिलेटने स्वीडनमध्ये सुरु असलेल्या डायमंड लीगच्या स्टाॅकहोम सत्रात ८९.९४ मीटरचे रेकाॅर्ड थ्रोसह एक नवीन राष्ट्रीय विक्रम बनवला आहे. २४ वर्षाच्या नीरजने ८९.३० मीटरचा मागील विक्रम मोडला आहे, तो विक्रम त्याने तुर्कूमध्ये पावो नुरमी खेळांमध्ये रचला होता.
त्याने या आठवड्याच्या प्रारंभी पावो नुरमी खेळांमध्ये ८९.३० मीटर भालाफेक करुन रजत पदक जिंकले होते आणि आपलाच राष्ट्रीय विक्रमही मोडला होता. नीरज स्टाॅकहोममध्ये भाग घेणारा पहिला भारतीय खेळाडू आहे. या डायमंड लीगमध्ये तो सातव्यांदा सहभागी होत आहे.