दुर्गा देवीचे नववे रूप म्हणजे देवी सिद्धीदात्री देवी. सर्व सिद्धीची अधिष्ठात्री देवी म्हणून देवीच्या या स्वरूपाला सिद्धीदात्री असे संबोधले जाते. सिद्धीदात्री देवी कमळावर विराजमान आहे. चतुर्भुजअसलेल्या सिद्धीदात्री देवीच्या हातामध्ये कमळ, शंक, गदा, सुदर्शन चक्र आहे.