Ad imageAd image

मुंबईकरांनो आता वर्षभर पाण्याचे नो टेन्शन, महापालिकेने दिली मोठी गुडन्यूज

ratnakar
मुंबईकरांनो आता वर्षभर पाण्याचे नो टेन्शन, महापालिकेने दिली मोठी गुडन्यूज
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 गेल्या काही दिवसांपासून मुंबईत मुसळधार पाऊस पाहायला मिळत आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणक्षेत्रातही चांगला पाऊस होताना दिसत आहे. सतत कोसळणाऱ्या पावसामुळे मुंबईतील अनेक धरण ओव्हरफ्लो होताना दिसत आहे. त्यामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. आता मुंबईकरांसाठी आणखी एक गुडन्यूज समोर आली आहे. मुंबईतील पाचवा तलाव ओव्हर फ्लो झाला आहे.

मुंबई महानगरपालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 जलाशयांपैकी ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा जलाशय’ हे तलाव आज ओव्हरफ्लो झाले. रविवारी 4 ऑगस्ट 2024 रोजी पहाटे 2 वाजून 45 मिनिटांनी हे धरण पूर्णपणे भरले. यानंतर या तलावाचे दोन दरवाजे उघडण्यात आले. सध्या या वैतरणा धरणातून 706.30 क्युसेक या दराने पाण्याचा विसर्ग सुरू आहे, अशी माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जलअभियंता खात्याद्वारे देण्यात आली आहे.

गेल्याच महिन्यात तुळशी, विहार, मोडक सागर, तानसा हे तलाव ओसंडून वाहू लागले होते. त्यापाठोपाठ आज ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा जलाशय’ देखील पूर्ण भरले आहे. यानुसार यंदाच्या पावसाळ्यात बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 तलावांपैकी 5 तलाव आतापर्यंत पूर्ण क्षमतेने भरले आहेत. मागील काही दिवसांमध्ये पाणलोट क्षेत्रात सातत्याने होत असलेल्या दमदार पावसामुळे जलाशयांची पाणी पातळी झपाट्याने वाढली आहे.

आज मध्यरात्री भरलेल्या हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा जलाशयाची कमाल पाणी साठवण क्षमता ही 193,530 दशलक्ष लीटर (19,353 कोटी लीटर) इतकी आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यात 102.4 मीटर उंचीचे आणि ५६५ मीटर लांबीचे मध्य वैतरणा धरण सन 2014 मध्ये पूर्ण केले. हे धरण महानगरपालिकेने विक्रमी वेळेत बांधून पूर्ण केले होते. या धरणाचे नामकरण ‘हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा जलाशय’ असे करण्यात आले आहे.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या या 7 धरणांची एकूण कमाल पाणी साठवण क्षमता ही १,४४,७३६.३ कोटी लीटर (१४,४७,३६३ दशलक्ष लीटर) इतकी आहे. सध्या सर्व ७ तलावांमध्ये मिळून ८९.१० टक्के इतका जलसाठा आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Share This Article