भाजप माध्यम प्रमुख शरद पाटील यांचे वडील परशराम धाकलू पाटील उर्फ पी डी पाटील यांचे 21 मार्च रोजी निधन झाले. शनिवारी पाटील कुटुंबीयांची खासदार मंगला सुरेश अंगडी व सहकारी यांनी भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.
याप्रसंगी भाजप मंडळ अध्यक्ष विजय कोडगणुर नगरसेविका विना विजापूरे नगरसेवक संदीप जिरग्याळ, विनोद लंगोटी आदर्श नूलि व भाजप कार्यकर्ते उपस्थित होते. भाजप माध्यम प्रमुख म्हणून शरद पाटील धुरा सांभाळत आहेत.
या कुटुंबीयांचा सहभाग राजकीय क्षेत्रात असून शरद पाटील यांचे वडील गेल्याने पाटील कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्या दुःखात समस्त भाजप नेते, पदाधिकारी सहभागी आहोत. असे मत खासदार मंगला सुरेश अंगडी यांनी व्यक्त केले.