बेळगाव : बेळगावात शुक्रवारी युवक काँग्रेसच्या वतीने भाववाढ आणि राज्य भाजप सरकारच्या 4० टक्के कमिशनच्या निषेधार्थ मोर्चा व जोरदार निदर्शने करण्यात येणार आहे.
युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष बी. व्ही. श्रीनिवास, अध्यक्ष मोहम्मद नलपाड, केपीसीसीचे कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी, आमदार लक्ष्मी हेब्बाळकर, अंजली निंबाळकर, महांतेश कौजलगी, गणेश हुक्केरी, चन्नराज हट्टीहोळी आणि युवा काँग्रेसचे राष्ट्रीय व राज्याचे पदाधिकारी, जिल्ह्यातील माजी मंत्री, माजी खासदार, माजी आमदार व काँग्रेसचे नेते, कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.
सकाळी 11 वाजता कॅम्प हनुमान पुतळ्यापासून (बोगरवेसजवळ) येथून निषेध मोर्चा निघेल आणि कॉलेज रोडने चन्नम्मा सर्कलवर पोहोचुन तेथे निदर्शने केली जाणार असल्याची माहिती जिल्हा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष मृणाल हेब्बाळकर यांनी कळविले आहे.