बेळगाव : आमदार अनिल बेनके यांच्या वतीने दसरा सणानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून, त्याचाच एक भाग म्हणून आज शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या.
नियोजित वेळेनुसार सरदरा मैदानावर स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. मात्र पावसामुळे महिला विद्यालय इंग्रजी माध्यम, मराठी माध्यम शाळा, जीए महाविद्यालय आणि सरदार मैदानावरील सभागृहात या स्पर्धा घेण्यात आल्या.
UKG, 1ली आणि 2री वर्गातील विद्यार्थी (राष्ट्रीय ध्वज आणि परिसर) 3री आणि 7वी वर्गातील विद्यार्थी (स्वच्छ भारत अभियान आणि ISRO स्पेस शटल) इयत्ता 7 ते 10 च्या विद्यार्थ्यांसाठी (हर घर तिरंगा ,भाजी मार्केट), महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी (भारतीय सेना, दांडिया रास गरबा व दांडिया ) स्पर्धा घेण्यात आल्या.
आमदार अनिल बेनके यांनी कला स्पर्धांचे निरीक्षण केल्यानंतर सांगितले की, विद्यार्थी अपेक्षे पेक्षा जास्त उत्साहाने सहभागी झाले आहेत. स्पर्धा आयोजित करण्यात मदत केल्याबद्दल त्यांनी शिक्षण विभागाचे आभार मानले. यावेळी आमदार अनिल बेनके यांनी राष्ट्रध्वज काढून सर्वांचे लक्ष वेधले.