बेळगाव : नगरविकास प्राधिकरण अनुदानातुन 23 कोटी रुपये खर्चाच्या रामतीर्थ नगर येथे विविध विकास कामांचा शुभारंभ आमदार अनिल बेनके यांच्या हस्ते करण्यात आले.
आज आमदार अनिल बेनके यांच्या हस्ते एकाच वेळी पाच ठिकाणी गटर, रस्ता, डेकोरेटिव्ह लाईट, नाला बांधकामाचे भूमीपूजन करून कामाला चालना देण्यात आली.
पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, अनेक वर्षांपासून स्थानिक रहिवाशांच्या मागणीवरून आज या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. 28 किलोमीटर गटर, रस्ते, पथदीपक , नाल्यांचे बांधकाम सुरू करण्यात आले आहे. कामाबाबत कोणतीही अडचण असल्यास त्यांनी ठेकेदाराशी बोलून ते सोडवावे.
दर्जेदार काम वेळेत करण्याच्या सूचना ठेकेदाराला देण्यात आल्या आहेत. आणखी 8 दिवसांत 10 कोटी रुपये खर्चाचे काम सुरू होईल, असे आमदार अनिल बेनके यांनी सांगितले.
यावेळी एई एस सी नाईक, एईई हिरेमठ, प्रसन्नकुमार
नगरसेवक हणमंत कोंगाली, विलास केरूर, एन.बी.निर्वाणी, एस.एस.किडसन्नवर, सुरेश यादव, जैन, एम.टी. पाटील, संतोष देसाई, बसवराज यरगणी, आनंद देसाई, नवीन हिरेमठ, मृत्युंजय कुलकर्णी, गुरुदेव पाटील, चौडप्पण्णावर, व रामतीर्थ नगर येथील प्रमुख, कंत्राटदार केकेबी, कॉन्स्ट्रुकशन व एन एस बिरादार उपस्थित होते.