बेळगाव ग्रामीण क्षेत्रांमध्ये संक्रामित रोगामुळे जनावरांचा बळी जात आहे त्यामुळे जिल्हा प्रशासनाने लवकरात लवकर याकडे लक्ष द्यावे अशी मागणी आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी केली आहे. ह्या संक्रामित रोगांपासून जनावरांची मोठया प्रमाणात जीव हानी होत आहे त्यामुळे शेतकरी या विषयाबद्दल आगतिक झाला आहे. जिल्हाधिकारी, जिल्हा प्रशासन आणि राज्य सरकार यांनी लवकरात लवकर या कडे लक्ष देऊन ह्या संक्रमित रोगाचा उपचार करण्यासाठी आणि या रोगाला प्रतिबंध घालण्यासाठी काम करायला पाहिजे.
जानवराला आलेल्या या संक्रामित रोगाला लेटेस्ट उपचार नाही त्यामुळे आतापर्यंत शेळी – बकरी यांना व्हॅक्सिन दिले आहे तरी हे पण जास्त परिणामकारी नसून त्याचा कुठलाही उपयोग या आजाराला प्रतिबंध करण्यासाठी होत नाही. पशुवैद्याना जास्तीत जास्त संख्या मध्ये बेळगाव परिसरात बोलवलं पाहिजे आणि तातडीने उपचार करण्याची गरज आहे.
यासाठी पालकमंत्री, जिल्हाधिकारी आणि अधिकाऱ्यांची सभा बोलवण्याची निकडीची गरज आहे. 2018-19 आणि 2019-20 मध्ये असाच संक्रामित रोग पसरला होता. राज्य सरकारने कुठल्याही जनावराचा बळी गेला असेल तर त्याला नुकसान भरपाई म्हणून दहा हजार रुपये दिले होते. त्यानंतर शेतकऱ्यांना आता नुकसान भरपाई मिळवणे शक्य नाही कारण जनावरांचा विमा केला गेला नाही.
या अनेक समस्यामुळे माझ्या क्षेत्राचे शेतकरी खूपच आर्थिक संकटात आहेत आणि ह्या संक्रामित रोगामुळे आगतिक झाले आहेत त्यामुळे राज्य सरकार शिग्रतसिग्र शेतकऱ्यांच्या मदतीला धावून यावे अशी मागणी आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी केली आहे.