बेळगाव ग्रामीण क्षेत्रातील संक्रामित रोगामुळे बळी गेलेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची घोषणा सरकारकडून झाल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी आभार मानले. गेल्या काही दिवसांपासून जनावरांना आलेल्या संक्रामित रोगाने शेतकऱ्यांना खूपच अडचणीत आणले होते त्यामुळे ग्रामीण क्षेत्रांमध्ये संक्रमित रोगाने ग्रासलेल्या जनावरांचा उपचार करण्यासाठी आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सरकार आणि जिल्हा प्रशासनाला लवकरात लवकर याकडे लक्ष देऊन संक्रमित रोगाला बळी गेलेल्या जनावरांची नुकसान भरपाई म्हणून शेतकऱ्याला मदतीचा हात द्यावा असा आग्रह आमदारांनी केला होता आणि याचं आग्राहाला मुख्यमंत्री बसवराज बोमाई यांनी प्रतिसाद देत या सर्व प्रकरणाला सरकारकडून रोगग्रस्त झालेल्या जनावराला मोफत चिकित्सा आणि बळी गेलेल्या जनावरासाठी शेतकऱ्यांना वीस हजार रुपये नुकसान भरपाई देण्याची घोषणा केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या ह्या घोषणेनंतर मुख्यमंत्री बसवराज बोमाई आणि राज्य सरकारांना शेतकरी यांच्या वतीने आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी आभार व्यक्त केले आहेत.