बेळगाव : डिसेंबरच्या हिवाळी अधिवेशनात मल्टी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या दोन मजल्यांचे उद्घाटन करणार असल्याचे आमदार अनिल बेनके यांनी सांगितले.
बीम्स संचालक डॉ. अशोककुमार शेट्टी यांच्यासोबत बैठक घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, डिसेंबरमध्ये बेळगाव येथे हिवाळी अधिवेशन होणार असून, त्यावेळी बेळगाव शहरात प्रगतीपथावर असलेल्या मल्टी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे उद्घाटन होणार आहे.
बेळ्ळारी हॉस्पिटलमध्ये जी समस्या झाली ती बेळगावच्या बीम्स हॉस्पिटलमध्ये होऊ नये. ऑक्सिजनची अडचण होणार नाही याची काळजी घ्यावी, तसेच वीज बिघाड झाल्यास ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी जनरेटर सज्ज ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
याआधी बीम्सचे संचालक डॉ. अशोककुमार शेट्टी यांची भेट घेतली. या बैठकीत दररोज दाखल होणाऱ्या रुग्णांची माहिती घेण्यात आली. प्रत्येक दैनंदिन ओपीडीमध्ये जमा होणाऱ्या पैशांची माहिती घेतली.
नित्यनियमित बायोमेट्रिक प्रणाली योग्य प्रकारे काम करायला हवी, याकडे त्यांनी लक्ष जास्त दिले ते म्हणाले की, रक्त सटा, x-ray 24 तास सेवा द्यावी.
यावेळी बीम्सचे संचालक, जुन्या इमारतींची दुरुस्ती सुरू आहे. बाह्यरुग्णांसाठी जेवणाची खोली बांधू.रुग्णालयात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करू. रुग्णांसाठी प्रतीक्षालय बांधण्याचा विचार करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
त्यानंतर आमदारांनी अधिकाऱ्यांसह रुग्णांना दिल्या जाणाऱ्या जेवणाची पाहणी केली. ऑक्सिजन पुरवठ्यासाठी वापरल्या जाणार्या जनरेटरची पाहणी केली, नव्याने बांधण्यात आलेले मल्टी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या कामाची पाहणी केली. बिम्सच्या सीईओ शाहिदा आफरीन, सीएओ आणि एफ गौरीशंकर यांच्यासह वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.