बेळगाव :महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी शनिवारी बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील विविध गावांतील पूरस्थितीचा आढावा घेतला असून लोकांच्या दुरवस्थेला सकारात्मक प्रतिसाद देत आहेत. याशिवाय त्यांची लक्ष्मी ताई फाऊंडेशन सुद्धा पीडितांना आर्थिक मदत करत आहे.
शनिवारी सकाळी त्यांनी पूरग्रस्त बसुर्ते गावाला भेट देऊन नुकसान झालेल्या ठिकाणांची पाहणी केली. पीडितांच्या व्यथा ऐकल्या. सरकारकडून पुरेशी भरपाई दिली जाईल. कोणीही नाउमेद होऊ नये, अशी हिंमत त्यांना दिली. नंतर काही पीडितांना लक्ष्मीताई फाउंडेशनने आर्थिक मदत केली.
त्यानंतर सततच्या पावसामुळे निर्माण झालेली पूरस्थिती पाहता बेक्कीनाकेरी गावाला भेट देऊन नुकसान झालेल्या ठिकाणांची माहिती घेतली. सर्व बाबींचा आढावा घेतल्यानंतर मंत्र्यांनी पीडितांच्या हालअपेष्टाबाबत प्रतिक्रिया दिली. काही पीडितांना लक्ष्मीताई फाउंडेशनतर्फे आर्थिक मदत देण्यात आली.
यावेळी तहसीलदार, पंचायत विकास अधिकारी, ग्राम लेखापाल, महसूल निरीक्षक व इतर विभागाचे अधिकारी व कामगार उपस्थित होते. मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी पावसातही जनतेशी सतत संपर्क साधला म्हणून सर्वत्र कौतुक होत आहे. लोकांच्या अडीअडचणींना उत्तर देऊन मंत्री आपण सर्व परिस्थितीत जनतेसोबत असल्याचा संदेश देत आहेत.