बेळगाव : जनतेचे आरोग्य अबाधित राहावे म्हणून बेळगाव जिल्ह्यासह आठ जिल्ह्यांमध्ये गृह आरोग्य योजने अंतर्गत घर घर जाऊन आरोग्य तपासणी केली जाणार असल्याचे आरोग्य एवं कुटुंब खात्याचे मंत्री दिनेश गुंडुराव यांनी पत्रकार परिषदेमध्ये माहिती दिली. सुवर्ण विधानसभा येथे अधिकाऱ्यांशी बैठक झाल्यानंतर आयोजित पत्रकार परिषद मध्ये माहिती .
सध्या राज्यामध्ये आरोग्याच्या दृष्टिकोनातून सरकारने योग्य पाऊल उचलले असून येत्या काळामध्ये प्रत्येक घराघराला भेट देऊन घरातील सदस्यांची आरोग्य तपासणी करून डायबिटीज रक्त तपासणी सह इतर रोगांची प्राथमिक तपासणी केली जाणार असल्याचे ते म्हणाले, एकूण आठ जिल्ह्यामध्ये ही तपासणी केली जाणार असून प्राथमिक बेळगाव व गदग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यामध्येही याचा विस्तार केला जाणार असल्याचे ते म्हणाले, ते पुढे म्हणाले की लहान वयातील मुलांना डायबिटीस ब्लड प्रेशर सह इतर रोगांची तपासणी केली जाणार असल्याचे ते म्हणाले या तपासणीमुळे जनतेला याचा लाभ निश्चितच होणार असून याच्यावर आळा येईल असे म्हणत त्याने राज्यामध्ये घराघरातील प्रत्येक व्यक्तीला तपासणी करून आरोग्याच्या दृष्टिकोनातून मोठ्या व्यापक पद्धतीने आपण तपासणी करणार असल्याचेही मंत्री दिनेश गुंडराव म्हणाले.