बेळगाव : गुरुवारी दुपारी बेळगाव उत्तर मतदारसंघाचे आमदार आसिफ राजू सैत यांनी शांतता कमिटीला गणेश चतुर्थी आणि ईद मिलादच्या बैठकीसाठी बोलावले होते. बैठकीला शहर पोलीस आयुक्त आणि डीसीपी उपस्थित होते.
शहरातील शांतता अबाधित राखण्यासाठी कोणत्या खबरदारीच्या उपाययोजना केल्या जातील यासह दिवसभरातील गोष्टी कशा पुढे जातील, याबाबत सर्व विविध गोष्टींवर चर्चा करण्यात आली. बेळगावच्या जनतेने शहरात शांतता व सुव्यवस्था राखून बंधुभावाने सणाचा आनंद घ्यावा, असे आवाहन श्री.सैत यांनी केले.