spot_img
spot_img
spot_img
20.4 C
Belagavi
Tuesday, December 5, 2023
spot_img
spot_img

खानापूर तालुक्यातील मराठी भाषिकांना उमेदवारी मिळाल्याने त्रिशंकू लढत होणार

खानापूर : खानापूर तालुक्यामध्ये मराठी भाषिक संख्याबळ अधिक आहे यामुळे राष्ट्रीय पक्षाने व महाराष्ट्र एकीकरण समितीने मराठी भाषिकांनाच उमेदवारी दिल्याने निश्चितच त्रिशंकू लढत होणार असल्याचे सिद्ध झाले आहे याबद्दल आपण कशी रणनीती आखणार असा प्रश्न खानापूर समितीचे उमेदवार मुरलीधर पाटील यांना केला असता मुरलीधर पाटील म्हणाले की त्रिशंकू लढत आहे हे खरे पण ज्या वेळेला स्वतःला मराठी भाषिक म्हणून घेणारे राष्ट्रीय पक्षातील नेते ज्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा आव्हान झाला तेव्हा मराठी भाषिक असलेले माझे आमदार अनिल बेनके व खानापूरच्या आमदार अंजलीताई निंबाळकर व विठ्ठल हलगेकर हे सारे काय करत होते स्वतःच्या स्वार्थासाठी मराठी भाषिकांच्या नावावर आपले पोळी भाजून घेत आहे हे जनतेला समजून आले आहे यामुळे येत्या काळात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारालाच जनता आशीर्वाद करणार असल्याचे ठामपणे मुरलीधर पाटील यांनी सांगितले एवढेच नसून शिक्षण क्षेत्रामध्ये खानापूर तालुका मागासलेला आहे असे का म्हटले असता यावरही त्यांनी उत्तर देतेवेळी सांगितले की सध्या आपण राहतो कर्नाटकात यामुळे कन्नड भाषेची समस्या मुळात आपला भाग मराठी भाषिक अधिक असलेला आहे पण सरकार म्हणावे तसे शिक्षण क्षेत्राकडे लक्ष देत नसल्यानेच ही समस्या उद्भवली आहे हे खरे आहे अशा अनेक प्रश्नांवर त्यांनी पत्रकाराची संवाद साधताना सांगितले महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने सोमवारी अधिकृत उमेदवार मुरलीधर पाटील हे अर्ज दाखल करणार असून कार्यकर्त्यांना चौराशी मंदिरात जमण्याचे आवाहन केले आहे

सोमवारी सकाळी ११ वाजता चौराशी ‘मंदिरात दर्शन घेतल्यानंतर शहरातील प्रमुख मार्गावरून मिरवणूक काढून तहसीलदार कार्यालयात अर्ज दाखल करण्यात येणार आहे. यासाठी समिती कार्यकर्त्यांनी चौराशी मंदिरात जमावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

यावेळी बोलताना यशवंत बिरजे म्हणाले राष्ट्रीय पक्षातील बंडाळी पाहता सर्वसामान्य जनतेतून समितीचा उमेदवार निवडून यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

समितीत एकी झाल्यानंतर समिती प्रबळ झाल्याने राजकीय पक्षातील नेतेमंडळी हातबळ झाले आहेत येत्या निवडणुकीत मराठी भाषिक आपला मराठी बाणा दाखवून देतील, असेही उमेदवार मुरलीधर पाटील म्हणाले य

• त्यावेळी शंकर गावडे निरंजन सरदेसाई, नारायण कापोलकर धबाले, पुंडलिक पाटील, दळवी, प्रल्हाद मादार, प्रक मयप्पा पाटील आदीसह पदाधिकारी उपस्थित होते

Related News

नोबेल पारितोषिक विजेते अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन यांचं निधन

नवी दिल्ली : प्रतिष्ठेचा नोबेल पारितोषिक विजेते भारतीय अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन यांचं निधन झालं असून वयाच्या ८९ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

पाच राज्यांच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर; मतदान कधी आणि निकाल कधी लागणार जाणून घ्या

नवी दिल्ली- पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेत याबाबत माहिती देण्यात आली आहे.  मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड,...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisement -spot_img

Latest News

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img