Ad imageAd image

“महाविकास आघाडीच्या गाडीला ना चाक, ना ब्रेक, चालकाच्या सीटसाठीही रस्सीखेच…”; धुळ्यातील सभेतून पंतप्रधान मोदींची टीका

ratnakar
“महाविकास आघाडीच्या गाडीला ना चाक, ना ब्रेक, चालकाच्या सीटसाठीही रस्सीखेच…”; धुळ्यातील सभेतून पंतप्रधान मोदींची टीका
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

धुळे : महाविकास आघाडीच्या गाडीला ना चाक आहेत ना ब्रेक आहेत. चालकाच्या सीटसाठीही तिन्ही पक्षात रस्सीखेच सुरू आहे. आम्ही जनतेला ईश्वरांच रुप मानतो. जनतेची सेवा करण्यासाठी राजकारणात आलो आहे. मात्र, महाविकास आघाडीतील नेते जनतेला लुटण्यासाठी राजकारणात आले आहेत, अशी टीका पंतप्रधान मोदी धुळे येथील सभेतून बोलताना केली. पंतप्रधान मोदी यांनी धुळ्यातून महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात केली. यावेळी बोलताना त्यांनी काँग्रेससह महाविकास आघाडीला लक्ष केलं.

पंतप्रधान मोदी म्हणाले, महाविकास आघाडीच्या नेत्यांनी प्रत्येक योजनेत भ्रष्टाचार केला. राज्यातील जनतेने त्यांचं अडीच वर्षांचे शासन बघितलं आहे. आधी त्यांनी सरकार लुटले, नंतर जनतेला लुटलं. त्यांनी मेट्रो प्रकल्प बंद केले, वाढवण बंदराचं काम थांबवण्याचा प्रयत्नही त्यांनी केला. तसेच समृद्धी महामार्गाला विरोध केला, अशा नेत्यांपासून आता महाराष्ट्रातील जनतेने सावध होण्याची गरज आहे.

महायुती सरकारच्या केंद्रस्थानी महिला आहेत. कारण महिलांचा विकास झाला, तरच समाजाचा विकास होता. त्यामुळे आम्ही महिलांना केंद्रस्थानी ठेऊन अनेक योजना सुरू केल्या आहेत. महाराष्ट्रातील महायुती सरकारनेही लाडकी बहीण सारख्या अनेक योजना सुरु केल्या आहेत. लाडकी बहीण योनजेची चर्चा केवळ महाराष्ट्रातच नाही देशभरात सुरु आहे. मात्र, काँग्रेस आणि महाविकास आघाडी नेते ही योजना बंद करण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यासाठी त्यांचे काही लोक न्यायालयातही जाऊन आले. त्यांना महिलांचा झालेला विकास पचणी पडत नाही, अशी टीकाही पंतप्रधान मोदी यांनी केली.

पुढे बोलताना, गेल्या अडीच वर्षात महायुती सरकारने विकासकामांचा नवा उच्चांक गाठला आहे. एकनाथ शिंदे यांचे नेतृत्वाखाली महाराष्ट्राला गौरव पुन्हा मिळाला आहे. भाजपा महायुती आहे, तर गती आहे आणि तरच महाराष्ट्राची प्रगती आहे, आम्ही मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्चा दिला. गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी आम्ही पूर्ण केली. दुसरीकडे काँग्रेसने राज्यात आणि केंद्रात सत्ता असताना मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याच्या मागणीकडे दुर्लक्ष केलं. हाच त्यांचा खरा चेहरा आहे, असेही ते म्हणाले.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Share This Article