Ad imageAd image

महाराष्ट्राचे नवे राज्यपाल, राष्ट्रपतींकडून घोषणा; महाराष्ट्रातील ‘या’ नेत्यावर राजस्थानची जबाबदारी

ratnakar
By ratnakar
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल, राष्ट्रपतींकडून घोषणा; महाराष्ट्रातील ‘या’ नेत्यावर राजस्थानची जबाबदारी
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Governor C P Radhakrishnan : रमेश बैस यांची १८ फेब्रुवारी २०२३ रोजी महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नेमणूक झाली होती.
झारखंडचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन हे आता महाराष्ट्राचे राज्यपाल बनणार आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी याबाबतची घोषणा केली आहे. राधाकृष्णन हे आता रमेश बैस यांची जागा घेतील. ‘महाराष्ट्राच्या विधानसभेचे माजी अध्यक्ष आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे यांची राजस्थानच्या राज्यपालपदी नेमणूक करण्यात आली आहे.

दरम्यान, झारखंडमध्ये सी. पी. राधाकृष्णन यांच्या जागी भाजपाचे वरिष्ठ नेते संतोष कुमार गंगवार यांची राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रपती भवनाने शनिवारी रात्री अनेक राज्यांमधील राज्यपालांच्या नियुक्तीची घोषणा केली.

काही महिन्यांनी महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक होणार आहे. तत्पूर्वी राष्ट्रपतींनी राज्याला नवे राज्यपाल दिले आहेत. राधाकृष्णन हे अनेक वर्षांपासून भाजपाचे सक्रीय सदस्य आहेत. ते दोन वेळा तमिळनाडूच्या कोईंबतूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार राहिले आहेत. तसेच त्यांनी काही वर्षे तमिळनाडू भाजपाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून काम पाहिलं आहे. २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीत भाजपाने त्यांना लोकसभेचं तिकीट दिलं होतं. मात्र, देशात मोदींची लाट असतानाही ते पराभूत झाले होते. १८ फेब्रुवारी २०२३ रोजी राष्ट्रपतींनी त्यांची झारखंडच्या राज्यपालपदी नियुक्ती केली होती. त्यानंतर दीड वर्षांनी त्यांच्याकडे महाराष्ट्रासारख्या बलाढ्य राज्याची धुरा सोपवण्यात आली आहे.

Haribhau Bagade Rajasthan Governor : महाराष्ट्राच्या विधानसभेचे माजी अध्यक्ष आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे यांची राजस्थानच्या राज्यपालपदी नेमणूक करण्यात आली आहे. बागडे हे गेल्या ६५ वर्षांपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी काम करत आहेत.

हरिभाऊ बागडे हे वयाच्या १२ व्या वर्षापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघात काम करत आहेत. ते चौथी इयत्तेत होते, तेव्हापासून संघासाठी काम करत आहेत. त्यानंतर १९८० साली भारतीय जनता पार्टीची स्थापना झाली. त्या वर्षीच्या निवडणुकीत भाजपाची बरीच पडझड झाली. त्यानंतर त्यांना वाटलं की आपण आता भाजपासाठी काम करावं. संघाबरोबरच भाजपासाठी देखील काम करण्याची इच्छा होती, त्यानुसार ते काम करू लागले. त्या काळात जिथे कोणी जात नव्हतं जिथे जाऊन त्यांनी काम केले. जिथे काम करायला कोणीही तयार नसायचं तिथे जाऊन ते काम करत होते. हाच त्यांचा पूर्वीपासूनचा स्वभाव असल्यामुळे ते इथवर आले आहेत. पक्षाने त्यांना जी जी कामं सांगितली, ज्या जबाबदाऱ्या दिल्या, त्या सर्व त्यांनी पार पाडल्या. त्याचंच फळ म्हणून आता त्यांची राज्यपालपदी नियुक्ती केली असावी.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Share This Article