Ad imageAd image

Maharashtra Election Exit Poll 2024 LIVE : पोल डायरीचा एक्झीट पोल, महायुती की मविआ? सर्वाधिक जागा कुणाला? पाहा अंदाज

ratnakar
Maharashtra Election Exit Poll 2024 LIVE : पोल डायरीचा एक्झीट पोल, महायुती की मविआ? सर्वाधिक जागा कुणाला? पाहा अंदाज
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Assembly Election 2024 Exit Poll Results LIVE News Coverage Updates in Marathi : राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी आज 20 नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली आहे. सकाळी 7 ते संध्याकाळी 6 पर्यंत मतदारांनी त्यांचा हक्क बजावला. आता राज्यात कुणाचं सरकार येणार? कोणत्या मतदारसंघातून कोण विजयी होउ शकतं? याचा अंदाज आपण एक्झिट पोलद्वारे जाणून घेऊयात.

पोल डायरीचा एक्झीट पोल, महायुती की मविआ? सर्वाधिक जागा कुणाला? पाहा अंदाज
पोल डायरीच्या या एक्झीट पोलनुसार राज्यात महायुतीचे सर्वाधिक उमेदवार विजयी होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या पोलच्या अंदाजानुसार, महायुतीचे 122 ते 186 उमेदवार हे जिंकतील. तर मविआचे 69 ते 121 उमेदवार जिंकतील असा अंदाज आहे. तर 12 ते 29 इतर जिंकतील असा अंदाज पोल डायरीने वर्तवला आहे.

मतदान झालं, आता साऱ्यांच लक्ष एक्झीट पोलकडे
मतदान प्रक्रिया पार पडली आहे.  आता साऱ्यांचं लक्ष हे एक्झीट पोलकडे लागून आहे. या एक्झीट पोलचा कौल कुणाच्या बाजूने असणार? कोणत्या मतदारसंघात कोण वरचढ ठरणार? याचा अंदाज थोड्यात वेळात एक्झीट पोलच्या माध्यमातून जाणून घेता येणार आहे.

मतदानाची वेळ संपली, उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत कैद
मतदानाची वेळ संपली आहे. उमेदवारांचं भवितव्य हे मतपेटीत कैद झालं आहे.  महाराष्ट्रात 5 वाजेपर्यंत  58.22  टक्के मतदान झालं आहे. संध्याकाळी 5 वाजेपर्यंत मुंबई शहरात सर्वात कमी तर गडचिरोलीत सर्वाधिक कमी मतदान झालं आहे.

पाहा जिल्हानिहाय मतदानाची आकडेवारी

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४

सायंकाळी ५ वाजेपर्यंत ५८.२२ मतदान.

गडचिरोली: ६९.६३% (सर्वाधिक)
मुंबई शहर- ४९.०७ टक्के (सर्वात कमी)

 

 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Share This Article