महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 : आजपासून आचारसंहिता लागू ; तर निवडणूक तारीख जाहीर होण्याची शक्यता :
Maharashtra Breaking News Live Updates, 15 October 2024 : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विधानसभा निवडणूक केव्हा जाहीर होणार याची सर्वच राजकीय पक्षांना उत्सुकता लागली होती. अखेर आज विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर होणार आहे. निवडणूक आयोग आज दुपारी ३.३० वाजता पत्रकार परिषद घेणार असून यावेळी महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार असल्याचे निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आलं आहे.
निवडणूक आयोगाने निवडणुकीची तारीख जाहीर करताच यावर विविध राजकीय प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे. तसेच बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. तर इतर आरोपींचा शोध शुरू आहे. महत्त्वाचे म्हणजे बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर अभिनेता सलमान खान याच्या सुरक्षेतही वाढ करण्यात आली आहे. याशिवाय राज्यातील इतरही घडामोडींकडे लक्ष लागले आहे.