बेळगाव : श्री कलमेश्वर को ऑप मल्टीपर्पस सोसायटी हालगा या सोसायटीच्या अध्यक्षपदाच्या चुरशीच्या निवडणूकीत आज
अध्यक्ष म्हणून महाबळेश्वर गावडू पाटील यांची निवड झाली तर
उपाध्यक्ष म्हणून सौ तेजस्विनी गुरूदास पठान याची निवड झाली.
नागेश पठान,वसंत सुतार ,ओमन्ना केसरेकर,विनायक रजकन्नवर तसेच सुनिता पाटील असे ७ मेंबर नी अध्यक्ष व उपाध्यक्ष यांच्या बाजूने मतदान केले तर विरोधकांकडे ५ सदस्य होते.
निवडणूक पार पडल्यानंतर हे सर्व ७ मेंबर खानापूरच्या माजी आमदार डॉ अंजलीताई हेमंत निंबाळकर यांना भेटण्यासाठी रायगड या निवासस्थानी आले होते.
ताई आज गोवा दौऱ्यावर असल्यामुळे ताईंच्या वतीने सुरेश भाऊ नी सर्वांचे अभिनंदन केले.
यावेळी सावित्री मादार, निरूपादी कांबळे, प्रकाश मादार, उमेश देवलत्ती, हणमंत पाटील, अर्जुन कट्टीमनी, साईश सुतार, महेश मादार , रवी बस्तवाडकर वगैरे सर्वजण उपस्थित होते.