बेंगळुरू : महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी विभागांतर्गत राबविण्यात येत असलेल्या कार्यक्रमांच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी महिला व बालकल्याण विभागाच्या सर्व जिल्हा उपसंचालकांसोबत बाल भवन, बंगळुरू येथील सभागृहात बैठक घेतली.
यावेळी महिला व विकास विभागाचे सचिव डॉ.जी.सी.प्रकाश, विभागाच्या संचालिका एम.एस.अर्चना, सहसंचालक डॉ.उषा, पुष्पा रॉयर, गीता पाटील यांच्यासह केंद्रीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.