खिश्चन लोकांमध्ये गुड फ्रायडे आणि ईस्टर संडे अत्यंत पवित्र मानले जातात.
★ अशी मान्यता आहे की गुड फ्रायडे च्या दिवशी येशूला वधस्तंभावर खिळण्यात आले आणि त्यांनी आत्मत्याग करून लोकांना प्रेमाच्या कळसाचं एक उदाहरण सादर केले आहे.
★ या दिवसाला होली डे, ग्रेट फ्रायडे आणि ब्लॅक डे असेही म्हणतात. मात्र याचं दिवसाला गुड फ्रायडे का म्हंटलं जातं? चला जाणून घेऊया…
◆ मान्यता काय??
● अशी मान्यता आहे की प्रभू येशू ख्रिस्त हे देवाचे पुत्र हिते.
● अज्ञान दूर करण्यासाठी आणि प्रेम आणि चांगुलपणा शिकवण्यासाठी ते या पृथ्वीवर जन्मास आले. त्यामुळे जेव्हा पितालुसने कट्टर लोकांचे समाधान करण्यासाठी येशू ख्रिस्तानवर अनेक अत्याचार केले तरीही त्यांनी ते सर्व सहन केलं.
● जेव्हा पितालुसने येशू यांना क्रॉसवर लटकवून त्यांचा जीव घेण्याचा आदेश दिला तरीही येशूंनी त्या लोकांच्या अज्ञानतेसाठी देवाला प्रार्थना केली की यांना माफ करा, कारण यांना माहिती नाही की हे काय करत आहेत.
● येशू यांनी प्रेमाचं सर्वोत्तम उदाहरण सादर करण्यासाठी आपल्या जीवाची कुर्बानी दिली.
● ज्या दिवशी त्यांना क्रॉसवर लटकवण्यात आले होते, त्या दिवशी फ्रायडे म्हणजेचं शुक्रवार होता.
● येशू यांनी महानता, त्याग,दया आणि प्रेमाची इच्छा पाहता या शुक्रवार ला गुड फ्रायडे म्हंटल जाऊ लागलं.
गुड फ्रायडे कसा साजरा केला जातो??
● लोक चर्चमध्ये जाऊन प्रभू येशूचं स्मरण करतात.
● काही लोक येशूच्या स्मरणार्थ काळे कपडे परिधान करून शोक व्यक्त करतात आणि पदयात्रा ही काढतात.
● या दिवशी मेणबत्ती लावली जात नाही आणि घंटाही वाजवली जात नाही.
● लोक लाकडाने खटखट असा आवाज करतात.
● वृक्षारोपण करतात आणि दान ही करतात.
★ इस्टर संडे म्हणजे काय??
मान्यतेनुसार, क्रॉसवर लटकवल्या नंतर तिसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारी येशू पुन्हा जिवंत झाले हिते. त्यानंतर त्यांनी आपल्या अनुयायांसोबत 40 दिवस वेळ घालवला. येशूच्या पुनःजीवित झाल्याने या दिवसाला इस्टर संडे म्हंटलं जातं. या दिवसापासून ते 40 दिवसापर्यंत इस्टर पर्व साजरा केला जातो.
ही माहिती जास्तीत-जास्त शेअर करा..!