नवी दिल्ली- जी-२० परिषदेचे अध्यक्षपद भारत भूषवत आहे. ९ आणि १० सप्टेंबर रोजी जी-२० परिषदेचे आयोजन करण्यात आले असून देशातील ६० शहरांमध्ये २०० पेक्षा जास्त बैठका पार पडल्या. बैठकीमध्ये काही महत्त्वाच्या विषयांवर एकमत झाले. तसेच बैठकीमधून महत्त्वाच्या पाच गोष्टी हाती लागल्या आहेत. याचा आढावा घेऊया…
1. आफ्रिकन युनियनला जी-२० गटामध्ये कायमस्वरुपी सदस्यत्व मिळालं आहे. त्यामुळे यापुढे जी-२०, जी-२१ नावाने ओळखली जाईल. विशेष म्हणजे भारताने आफ्रिकन युनियनला स्थिर सदस्यत्व देण्याचा प्रस्ताव ठेवला होता. त्याला सर्वांनी मान्यता दिली. आफ्रिकन युनियनसाठी ही महत्त्वाची संधी आहे.
2. सर्वसमावेशक रेल्वे आणि व्यापारी मार्ग कनेक्टिव्हिटी नेटवर्कची घोषणा करण्यात आली आहे. या नेटवर्कमुळे अमेरिका, भारत, सौदी अरेबिया व अरब देश आणि युरोपीयन युनियन याला जोडले जाणार आहेत. त्यामुळे व्यापार वृद्धी होणार असून यामुळे चीनच्या विस्ताराला लगाम लागण्याची शक्यता आहे.
3. दिल्ली घोषणापत्र स्वीकारण्यात आले आहे. यात चीन आणि रशियाचा देखील सहभाग आहे. त्यामुळे भारतासाठी हा मोठा विजय आहे. पंतप्रधान मोदी यांच्या मानव केंद्रीत जागतिकीकरणाच्या संकल्पनेचा हा विजय मानला जातोय. ग्रीन क्रेडिड मुद्द्यावर एकत्र काम करण्याचे आवाहन घोषणापत्रात करण्यात आले. विकास आणि पर्यावरण हातात हात घालून पुढे जाण्याची योजना यात आहे.
4. पंतप्रधान मोदी यांनी स्वच्छ इंधनाचा वापर वाढण्यासाठी ग्लोबल बायोफ्युयल आघाडीची घोषणा केली. शून्य उत्सर्जन साध्य करण्यासाठी आघाडीतील देश अधिक वेगाने प्रयत्न करतील. प्राण्यांच्या विष्ठेपासून आणि वनस्पतींपासूनच्या बायोइंधनाला प्रोत्साहन दिले जाणार आहेत.
5. जी-२० नेत्यांमध्ये सहकार्य वाढत असल्याचं शनिवारच्या बैठकीमधून दिसून आलं. तसेच भारताचा जागतिक नेतृत्वांमध्ये महत्त्वाचे स्थान मिळत असल्याचे हे निदर्शक आहे. भारताचे विकसनशील देशाकडून विकसित देशाकडे वाटचाल करण्यामध्ये ही परिषेद महत्त्वाची भूमिका बजावू शकते.