खानापूर : अंगणवाडी टीचर यांच्या नियुक्तीची खोटी सरकारी ऑर्डर…? पोलीसांनी तपास करावा खानापूर ब्लॉक कॉंग्रेस कडून मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात अधिकारी अधिकाऱ्यांच्या खोट्या सह्या करून ऑर्डर कोणाकोणांस दिल्या आहेत…
याप्रकरणात हजारो रूपयांचा गंड्डा घालण्यात आल्याचे स्वतः प्रवीण पाटील पाली यांनी सांगितले आहे अजून कोणाकोणास तालुक्यात अशा प्रकारचे गंडे घातले आहेत ? पोलीस तपास करतील का ?
यासंदर्भात आम्हास समजलेली माहिती अशी की,
प्रवीण पाटील मुपो पाली …. यांचे कोणीतरी ३० हजार रूपये घेऊन प्रवीण च्या पत्नीचे अंगणवाडी टीचर चे काम करतो असे खोटे सांगून ३० हजार रूपये उकळल्याचै प्रवीण पाटील यांनी पीएसआय बिरादार खानापूर यांचे समोर सांगितले.
पुढे बोलतांना प्रवीण पाटील यांनी पीएसआय बीरादार यांना, आपणांस खोटे सरकारी नियुक्तीपत्र सुद्धा मिळाल्याचे आपल्या मोबाईल मधे दाखविले….
सरकारी खोट्या नियुक्त्या करण्यापर्यंत लोकांची मजल गेली आहे. ही फसवणूक करणारी कोण लोकं आहेत ?
आज फक्त प्रवीण पाटील पाली यांचे एक प्रकरण समोर आले आहे अजून तालुक्यात असे किती लोकांना कोणी कोणी फसविले आहे याचा तपास पोलीस करतील का ? याचा सखोल सु मेटो तपास खानापूर पोलींसानी करावा अशी मागणी खानापूर तालुका ब्लॉक कॉंग्रेसचे अध्यक्ष ॲड घाडी यांनी केली आहे….
आत्ताच मिळालेली माहिती अशी आहे की प्रवीण पाटील यांचे पैसे व ओरीजनल कागदपत्रे परत मिळाली आहेत ???? पण प्रवीण ची कागदपत्रे व पैसे ८ महिने झाले मिळत नव्हते रोज प्रवीण चक्कर मारतं होता… पैसे परत मिळाले की नाही हे प्रविण पाटीलच सांगू शकेल…
पण महत्वाचा प्रश्न अनुत्तरीत रहातोय ?
सरकारी खोटे नियुक्तीपत्र कोणी बनविले ? कोणाकोणाचा यात सहभाग आहे ? खोटे शिक्के सील कुठे बनविले ? पत्र कोठे टाईप केले गेले ? याची उत्तरे खानापूर पोलीसांनी देणे गरजेचे आहे…
आज अन्यायग्रस्त प्रवीण पाटील यांस खानापूर कॉंग्रेस ने मदत केल्यामु़ळे कमीत कमी ८ महिन्यांनी पैसे व कागदपत्रे परत मिळाले असे प्रवीण पाटील म्हणतोय …
परंतु अंगनवाडी टीचरच्या खोट्या नियुक्तीचे जे पत्र प्रवीण पाटील यांना दिले गेले त्यांस जबाबदार कोण ???
खानापूर कॉंग्रेस तर्फे तमाम जनतेस नम्र आवाहन आहे की जर सरकारी नोकरी संदर्भात कोणाची फसवणूक झाली असल्यास ब्लॉक कॉंग्रस ला कळवावे.
आम्ही खानापूर पोलिसांना जाहीर आवाहन करतो की या प्रकरणाचा सु मोटो तपास करावा व अपराध्यांवर कडक कारवाई करावी….
प्रविण पाटील यांना खोटे सरकारी नियुक्तीपत्र मिळाले होते ते आम्हांस प्रवीण पाटील यांनी दिले आहे ते सोबत जोडत आहोत …
भगव्या शाली घालून चुकीचे उद्योग केले जात आहेत का ? हे पण तपासणे महत्वाचे आहे.