दृष्टीआड’ असलेल्या ‘सृष्टी’ चे महत्त्व मानवाला न समजण्याचे हे अगदी उघड उदाहरण म्हणता येईल. शुध्द हवा, पिण्याचे पाणी आणि इतरही अनेक बाबी आपल्याला मिळतात त्या जंगलांमुळेच. मात्र चंगळवादी जीवनशैली आणि आधुनिकीकरण साठी केल्या जाणा-या बेसुमार जंगलतोडीमुळे निसर्गाचा समतोल ढासळत असल्याचे १९७० च्या दशकात जाणवू लागले. त्यातून जंगले वाचवण्याची संकल्पना पुढे आली.
संयुक्त राष्ट्र संघाच्या अन्न व शेती संघटनेच्या सदस्य देशांनी हा ‘वर्ल्ड फॉरेस्ट डे’ साजरा करण्यास सुरुवात केली.
आंतरराष्ट्रीय वन दिन जगभर 21 मार्च 1971 मध्ये युरोपियन कॉन्फिडरेशन ऑफ अग्रिकल्चरच्या २३ व्या बैठकीत हा दिन साजरा करण्याची संकल्पना पुढे आली. हा दिवस सर्व प्रकारच्या जंगलांच्या महत्वाविषयी जागरुकता निर्माण करतो. प्रत्येक आंतरराष्ट्रीय वन दिनाच्या दिवशी, देशांना जंगल आणि झाडे यासारख्या वृक्षारोपण मोहिमेशी संबंधित क्रिया करण्यासाठी स्थानिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्रयत्न करण्यास प्रोत्साहित केले जाते.
दर वर्षी, जग आपल्या जीवनात झाडाचे योगदान साजरे करते. हा दिवस आपल्या जीवनातील वनांचे महत्त्व समजून घेण्यासाठी केला जातो. संयुक्त राष्ट्रांच्या म्हणण्यानुसार ६०,००० जगातील स्थलीय जैवविविधतेपैकी ८० टक्के आहेत. सुमारे १.६ अब्ज लोक अन्न, निवारा, ऊर्जा, औषधे आणि उत्पन्नासाठी जंगलांवर थेट अवलंबून आहेत.
पुढील मुद्यांची सर्वांनाच माहिती होण्यासाठी सरकार आणि विविध संस्था कार्यक्रम राबवतात.
० अनावश्यक जंगलतोड टाळणे. ०अधिक झाडे लावणे.
० जंगलांपासून मिळणारी उत्पादने आणि होणारे फायदे
० जंगलांना सतत भेट दिल्याने मिळणारी माहिती
जंगलांबाबत आस्था आणि जंगलतोडीमुळे होणा-या हवामानातील बदलांबद्दल चिंता वाटत असणा-या सर्वांना जागतिक पातळीवर व्यासपीठ मिळावे हा देखील वनदिन साजरा करण्यामागचा उद्देश आहे. बदलत्या हवामानावर भविष्यात उपाययोजना करणे आणि धोरण ठरवताना जंगलांबाबत योग्य विचार होत असल्याची आणि त्यानुसार वने वा जंगलांचे संरक्षण केले जाते याची खात्री या मंचावरून एकत्रितपणे करता येईल. या साठी संयुक्त राष्ट्र संघ स्थापन करण्यात आला. तरी प्रत्येकाने आपले निसर्गा प्रति असलेले कर्तव्य म्हणून किंबहुना आपणही या सृष्टी ला काही तरी देणं लागतो म्हणून एक झाड प्रत्येकाने दर वर्षी लावले च पाहिजे ; कारण निसर्ग आहे तर आपण आहोत.