खानापूर : आज खानापूर ब्लॉक कॉंग्रेस तर्फे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या अवमान प्रकरणी, शिवस्मारक चौकात, केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या विरोधात जोडे मारो आंदोलन करण्यात आले तसेच अमित शहा यांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या व तहसिलदार खानापूर यांना निवेदन देण्यात आले.
हा लढा बीजेपी – आरएसएस च्या मनुस्मृती विरूद्ध आपल्या बाबासाहेबांच्या संविधान यांच्या मधे आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे तमाम भारतीयांना देवापेक्षा कमी नाहीत पण मनुस्मृती वाल्यांना संविधान संपवायचे आहे, तसा त्यांचा प्रयत्न आहे त्यांचे खासदार उघडपणे संविधान संपविण्याची भाषा करतात. जर आपला देश व लोकशाही टिकवायची असेल तर संविधांनाला पर्याय नाही हे वेळीच आपण लक्षात घेतले पाहीजे.
परंतु वेळोवेळी अहंकारी भाजपाने बाबासाहेबांचा अपमान करण्याचा जणू विडाच उचलला आहे की काय अशी परिस्थिती यांनी निर्माण केली आहे. याच द्वेष भावनेतून परवा परवा केंद्रीय गृहमंत्री यांनी संसदेत बाबासाहेब यांचा अपमान केला आहे. यासंदर्भात देशभर आंदोलन होत आहेत याचाच भाग म्हणून आज खानापूर कॉॉग्रेस तर्फे अमित शहा यांचा निषेध करण्यात आला.
अमित शहा यांनी ताबड़तोड़ गृहमंत्री पदाचा राजीनामा देऊन देशाची माफी मागावी अशी मागणी ब्लॉक कॉंग्रेस तर्फे निवेदना द्वारे सन्माननीय राष्ट्रपती यांचेकडे करण्यात आली असून हे निवेदन तहसिलदार खानापूर यांना देण्यात आले. यावेळी खानापूर ब्लॉक कॉंग्रेस तर्फे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.