बेळगाव : हिंडलगा केंद्रीय कारागृहात एका अंडरट्रायल कैद्याने आत्महत्या केली. बच्चनकेरी गावातील मंजुनाथ नायकार ( वय वर्षे २०) असे आत्महत्या केलेल्या कैद्याचे नाव आहे.
तीन महिन्याच्या मागे फोक्सो कायद्यात अटक झाली होती. त्याला कैदी म्हणून ठेवलेल्या कोठडीतील बेडशीटने त्याने गळफास लावून घेतला अशी माहिती कारागृहातील अधिकाऱ्याने दिली आहे.