बेळगाव – व्यायामपटूंना बेळगावचे वातावरण अनुकूल आहे.बेळगाव जिल्ह्यात अनेक गुणवान होतकरू शरीरसौष्ठवपटू आहेत. यांना प्रोत्साहन देण्यासाठी बेळगावी डिस्ट्रिक्ट बॉडी बिल्डर असोसिएशन अँड स्पोर्ट्सची स्थापना करण्यात आली आहे.ही संघटना इंडियन ऑलिंपिक असोसिएशन व इंडियन बॉडी बिल्डिंग फेडरेशनशी संलग्नित आहे. अशी माहिती इंडियन बॉडी बिल्डिंग फेडरेशनचे अध्यक्ष सुरेश कदम यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली.
यावेळी पुढे बोलताना सुरेश कदम म्हणाले, इंडियन बॉडी बिल्डिंग फेडरेशनच्या वतीने विविध स्तरावरील बॉडी बिल्डिंग स्पर्धा इंडियन बॉडी बिल्डिंग फेडरेशन तसेच असोसिएशनच्या वतीने राज्य राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर आयोजित केल्या जात असतात.बेळगावातही 2002 मध्ये मिस्टर इंडिया स्पर्धा यशस्वीरित्या आयोजित करण्यात आली होती.मध्यंतरीच्या काळात संघटनेत मतभेद निर्माण झाले. अशावेळी बेळगावच्या व्यायामपटूंचे नुकसान होऊ नये. त्यांना जास्तीत जास्त रित्या चांगल्या प्रकारच्या सोयी सुविधा मिळाव्यात.विविध स्तरावरील स्पर्धांमध्ये खेळाडूंना सहभागी होता यावे. या दृष्टीने बेळगाव डिस्ट्रिक्ट बॉडी बिल्डर असोसिएशन एन्ड स्पोर्टस ची स्थापना करण्यात आली आहे .
या संघटनेच्या माध्यमातून बेळगाव शहर आणि ग्रामीण भागातील स्पर्धकांना पुढील काळात राष्ट्रीय स्पर्धा स्पर्धेत चमकण्याची संधी मिळणार आहे.बेळगावच्या शरीरसौष्ठवपटून जास्तीत जास्त प्रोत्साहन देणे हेच संघटनेचे मुख्य उद्दिष्ट आहे असे कदम यांनी स्पष्ट केले.
बेळगाव डिस्ट्रिक्ट बॉडी बिल्डर असोसिएशन अँड स्पोर्ट्स चे सेक्रेटरी अनिल अमरोषळे म्हणाले,बेळगावच्या शरीरसौष्ठवपटूंना चांगल्या प्रकारचे प्रशिक्षण मिळावे. त्यांना राष्ट्रीय स्तरावर आयोजित केल्या जाणाऱ्या स्पर्धेत भाग घेण्याची संधी मिळावी. युवकांना व्यसनांपासून अलिप्त ठेवून त्यांच्या मध्ये व्यायामाची आवड निर्माण करावी. यासाठी संघटनेची स्थापना करण्यात आली आहे. कोणत्याही संघटनेचे सदस्य असलेला शरीरसौष्ठवपटू कोणत्याही संघटनेने आयोजित केलेल्या स्पर्धेत सहभागी होऊ शकतो. संपूर्ण देशात व्यायामावर डॉक्टर केलेले एकमेव असे बेळगावचे डॉक्टर अमित जडे संघटनेचे सहसचिव आहेत.
गुरुवारी ओरिएंटल तुकाराम महाराज सांस्कृतिक भवनात सायंकाळी चार वाजता संघटनेच्या उद्घाटनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या संघटनेच्या माध्यमातून बेळगाव आणि परिसरातील व्यायामपटूंना नव्या संधी उपलब्ध होणार आहेत असेही अमरोळे यांनी स्पष्ट केले.
यावेळी संघटनेचे अध्यक्ष महेश सातपुते,उपाध्यक्ष सुनील चौधरी आणि बाबू पावशे,खजिनदार नारायण चौगुले, जनरल सेक्रेटरी राजेश लोहार, सहसचिव जितेंद्र काकतीकर, तांत्रिक सल्लागार भरत बाळेकुंद्री, सुनील बोकडे, प्रेमकांत पाटील, चेतन तहसीलदार आदी उपस्थित होते.