बंगळुरू: इस्रोच्या शास्त्रज्ञांच्या प्रयत्नांमुळे आणि भारतीयांच्या प्रार्थनांमुळे चांद्रयान-3 विक्रम लँडर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर वेळेवर यशस्वीरित्या चंद्रावर उतरला. संपूर्ण जगाने या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार झाले.
इस्रोने संध्याकाळी ६:०४ पर्यंत विक्रम लँडर चंद्रावर उतरवण्याची प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केली. चांद्रयान-3 विक्रम लँडर चंद्राच्या कक्षेत प्रवेश करणारा भारत जगातील चौथ्या क्रमांकाचा देश ठरला आहे आणि चंद्राच्या दक्षिण ध्रुवावार लँडिंग करणारा भारताने जगातील एकमेव देशाचा मान मिळवला आहे.
चंद्रयान-3 च्या यशस्वी लॅडिंगमुळे संपूर्ण भारत देशातून आनंदाचे वातावरण पसरले आहे. संपूर्ण देशातून ISRO चे शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.