बेळगाव : भारतीय जनता पार्टी बेळगाव महानगर जिल्हा अध्यक्ष व आमदार अनिल बेनके यांच्या नेतृत्वाखाली आज ओबीसी मोर्चा यांच्या वतीने ओबीसी समाजातील प्रमुख नेत्यांची व पंच मंडळींची शहरातील सदाशिवनगर येथील रड्डी भवन येथे समावेश आयोजन करण्यात आले होते.
यावेळी आमदार अनिल बेनके यांनी सांगितले की येत्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात सर्व ओबीसी समाज यांचा समावेश घेऊन ओबीसी काही समाजाच्या ज्या काही समस्या असतील किंवा त्यांना मिळणाऱ्या सरकारी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी व ओबीसी समाजाच्या सर्व समस्यांचे निवारण करण्यासाठी राज्यातून ओबीसीचे नेते, मुख्यमंत्री व केंद्रीय मंत्रिमंडळाच्या मोठ्या नेत्यांना या समावेश मध्ये बोलविणार असल्याचे त्यानी सांगितले. ओबीसी समाजाचे गाराने ऐकून घेण्यासाठी राज्यातून तसेच केंद्रीय नेत्यांना घेऊन येऊन एक व्यासपीठ निर्माण करून ओबीसी समाजाच्या विकासासाठी प्रयत्न करणार असे त्यांनी यावेळी आश्वासन सुद्धा दिले.
यावेळी महानगर जिल्हा ओबीसी मोर्चा अध्यक्ष श्री विनय कदम, जनरल सेक्रेटरी नितीन सुलगार, शेषकुमार जवलकर, बीजेपी उत्तर मंडळ ओबीसी मोर्चा अध्यक्ष विक्रम बाळेकुंद्री, बीजेपी दक्षिण मंडळ ओबीसी मोर्चा अध्यक्ष विनायक सूर्यपण, विश्वकर्मा पांचाळ समाज प्रमुख भरत शिरोळकर ,हिंदू खाटीक समाज प्रमुख उदय घोडखे, सावजी क्षत्रिय समाज प्रमुख अनिल चौधरी ,बासर क्षत्रिय समाज प्रमुख मदन गोजे, नामदेव शिंपी समाज प्रमुख अशोक रेडेकर, कुंभार समाज प्रमुख दिगंबर गुंजीकर, नामदेव शिंपी समाज शहापूर प्रमुख, तेली समाज प्रमुख प्रकाश बाळेकुंद्री ,गवळी समाज प्रमुख, दैवज्ञ सोनार समाज प्रमुख, गौड सारस्वत ब्राह्मण समाज प्रमुख, हरपत समाज प्रमुख, नाभिक समाज प्रमुख पिंटू काले, सविता समाज प्रमुख शेखर रेड्डी, परीट समाज प्रमुख विठ्ठल पलेकर, कालिका देवी ज्ञान समाज प्रमुख नितीन कलकर, निकार समाज प्रमुख ,विश्वकर्मा समाज प्रमुख ,हणबर समाज प्रमुख प्रवीण पाटील तसेच इतर कार्यकर्ते उपस्थित होते.