Ad imageAd image

ज्येष्ठ नागरिकांसाठी वॅक्सिंग डेपोत मनोरंजन केंद्राचे उद्घाटन

ratnakar
ज्येष्ठ नागरिकांसाठी वॅक्सिंग डेपोत मनोरंजन केंद्राचे उद्घाटन
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बेलगाम  : दक्षिण मतदार क्षेत्रामध्ये टिळकवाडी येथील वॅक्सिंग डेपो विभागात ज्येष्ठ नागरिकांसाठी मनोरंजन केंद्राचे उद्घाटन रविवारी सकाळी आमदार अभय पाटील व ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते करण्यात आले.

शांत निसर्गमय वातावरणात फिरण्यासाठी येणाऱ्या वॅक्सिंग डेपो येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी मनोरंजक केंद्राची करण्यात आली असून या ठिकाणी बॅडमिंटन, कॅरम बोर्ड,स्नूकर, बुद्धिबळ संगीताची आवड असलेल्यांना हार्मोनियम, गिटार, तबला, योगा करणाऱ्यांसाठी योगाची मॅट, चहापाणीसाठी कॅन्टीन ची सुविधा असे विविध मनोरंजन वस्तूंचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच ज्येष्ठांसाठी महिला व पुरुष विभागासाठी विश्रांतीगृहची पण सुविधा करण्यात आली आहे.

याव्यतिरिक्त ज्येष्ठ नागरिकांच्या आणखीन काही समस्या असतील त्या देखील केल्या जातील असे आश्वासन दक्षिणचे आमदार अभय पाटील यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हणाले.
यावेळी ज्येष्ठ नागरिक संघटनेमध्ये भरत देशपांडे, अनिल देशपांडे, भरत शानबाग, विनय याळगी, विजय भागवत, उपमहापौर आनंद चव्हाण,नगरसेवक गिरीश धोंगडी, सारंग नागोजीचे, सकाळचे फिरावयास येणारे मोठ्या संख्येने उपस्थित होते.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Share This Article