बेळगाव : भारतीय संविधान दिनानिमित्त बिजगराणी गावात नवनिर्मित संविधान शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनाचे उद्घाटन आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते शनिवारी झाले, तसेच ग्रामपंचायत इमारत व शेतकरी गोदामाच्या इमारतींचे भूमिपूजनही झाले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनीच जगातील महान राज्यघटनेद्वारे देशातील प्रत्येक नागरिकाला समानतेचा अधिकार दिला. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाच्या घराचे उद्घाटन करून ‘भारतीय राज्यघटना’ स्वीकारल्याच्या आजच्या दिवशी त्यांना विनम्र अभिवादन करूया आणि त्यांनी घालून दिलेल्या आदर्शावर चालण्याचे आवाहन लक्ष्मी हेब्बाळकर यांनी यावेळी केले.
याच प्रसंगी आमदारांनी गावाची स्वच्छता आणि सुरक्षितता लक्षात घेऊन कचरा उचलण्यासाठी “स्वच्छता वाहिनी” नावाचे वाहन सुरू केले.
या गावातील ज्येष्ठ नागरिक, एपीएमसी अध्यक्ष युवराज कदम, काँग्रेसच्या युवा नेत्या मृणाल हेब्बाळकर, यल्लाप्पा बेळगावकर, मनोहर बेळगावकर, अशोक चौघुले, ग्रामपंचायत सदस्य, पंचायत विकास अधिकारी हर्षवर्धन आगसरा, पूजा सुतार, विरेशा होसमथ, कार्यकारी अधिकारी राजेश दानवेकर, माजी जिल्हाध्यक्ष राजेश दानवेकर आदी उपस्थित होते. अरुण कटांबळे राजेंद्र मोराबाडा, गणेश के.एस.नामदेव मोरे, संतोष कांबळे, प्रेमा कांबळे यांच्यासह गावातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.