spot_img
spot_img
spot_img
21.3 C
Belagavi
Sunday, October 1, 2023
spot_img
spot_img

दुसऱ्या वनडेत रोहित शर्मा चूका सुधारणार, टीम इंडियामध्ये बदल केले जाणार!

नवी दिल्ली : भारताने पहिल्या वनडेत ओढून- तानून विजय मिळवला. कारण रोहित शर्माकडून या सामन्यात एकामागून एक चुका होत गेल्या. त्यामुळे आता दुसऱ्या वनडे सामन्यात रोहित आपल्या चुका सुधारण्यावर भर देणार आहे. दुसऱ्या वनडेत आता भारतीय संघात मोठे बदल होणार आहेत.

दुसऱ्या वनडेत गोलंदाजांनी आपले काम चोख केले होते. कारण त्यांनी ११४ धावांत वेस्ट इंडिजचा डाव गुंडाळला होता. यावेळीही रोहितच्या हातून काही चुका झाल्या. रोहितने यावेळी रवींद्र जडेजाला गोलंदाजी देण्यापूर्वी कुलदीप यादवला संधी द्यायला हवी होती. कारण कुलदीप हा एक चायनामन गोलंदाज आहे. त्याची गोलंदाजी समजणं हे सोपं नाही. त्यामुळे जडेजापूर्वी जर कुलदीपला संधी दिली असती तर कदाचित आणखी कमी धावांत वेस्ट इंडिजचा डाव आटोपला असता.

रोहितने यावेळी फलंदजाीमध्ये मोठ्या चुका केल्या. रोहितने यावेळी आपल्या सलामीच्या जागी इशान किशनला संधी दिली. रोहित हा एक अनुभवी खेळाडू आहे. त्यामुळे संघाची सुरुवात करताना एक अनुभवी खेळाडू मैदानात असायला हवा. जर इशानला सलामीला पाठवायचे होते तर शुभमन गिलला तिसऱ्या किंवा चौथ्य स्थानावर फलंदाजीला पाठवले जाऊ शकले असते. पण ते रोहितने केले नाही. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे विराट कोहली हा चांगल्या फॉर्मात आहे. त्यामुळे त्याची जागा बदलण्यात कोणताच अर्थ नव्हता.

पण भारताच्या संघ व्यवस्थापनाने हा मोठा निर्णय़ घेतला. त्यानंतर भारताच्या पाच विकेट्सही गेल्या, पण तरीही कोहलीला मात्र फलंदाजीला पाठवले नाही. ही रोहित शर्माची मोठी चूक होती. रोहितला आपल्या जागी कोहलीला फलंदाजीला पाठवता येऊ शकले असते, पण रोहितने तसे केले नाही. त्यामुळे या सामन्यात फलंदाजीचा क्रम बदलणे ही रोहितची सर्वात मोठी चूक होती. त्यामुळे रोहित शर्मा ही चुक दुसऱ्या सामन्यात बदलेल, अशी आशा आहे.

रोहित शर्माने जर दुसऱ्या वनडेत चुका सुधारल्या तर भारताला वनडे मालिकेत विजय मिळवता येऊ शकतो.

Related News

संपूर्ण समाज सरकारच्या पाठीशी आहे – लक्ष्मी हेब्बाळकर

बेंगळुरू : काँग्रेस पक्षाला सर्व समाजाचा पाठिंबा मिळाला आहे. केवळ एका समाजाच्या पाठिंब्याने सत्ता प्राप्त होत नाही. महिला व बालकल्याण विभागाच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर...

तुमच्या मालमत्तेच्या मूल्यांचे अवमूल्यन करू नका, वास्तविक मूल्यासाठी व्यापार करा

बेळगाव : कर्नाटक राज्य सरकारच्या स्थावर मालमत्ता मार्गदर्शक तत्त्वातील किंमत सुधारणा 1 ऑक्टोबर ते शेकडा 10% वरून 30% पर्यंत वाढ करण्याचा आदेश जारी करण्यात...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisement -spot_img

Latest News

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img