बेळगाव : पावसाचा जोर वाढल्यामुळं आलमट्टी धरणातील पाण्याचा साठा वाढला आहे. कर्नाटक राज्याच्या पाटबंधारे खात्याने (Karnataka Irrigation Department) दिलेल्या माहितीनुसार २२ जुलै रोजी आलमट्टी धरणातील एकूण पाणीसाठा ४४.४९५ टीएमसी तर जिवंत पाणीसाठा २६.८७५ टीएमसी इतका झाला आहे.
पण, गतवर्षीच्या तुलनेत हा पाणीसाठा खूपच कमी आहे. गतवर्षी जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून जोरदार पाऊस सुरू झाला होता. आलमट्टी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस झाला होता. त्यामुळे धरणातील पाण्याची पातळी झपाट्याने वाढली होती.
परिणामी, गतवर्षी २२ जुलै रोजी धरणातील एकूण पाणीसाठा ९६.८६१ टीएमसी तर जिवंत पाणीसाठा ७९. २४१ टीएमसी इतका होता. आलमट्टी धरणाची पाणी साठविण्याची क्षमता १२३.०८ टीएमसी इतकी आहे. कृष्णा नदीवर बांधण्यात आलेल्या या धरणाची चर्चा २००५ सालापासून सातत्याने होते.
आलमट्टी धरणामुळेच २००५ साली कृष्णा नदीला (Krishna River) महापूर आल्याचा ठपका महाराष्ट्राकडून ठेवण्यात आला होता. २०१९ साली त्याची पुनरावृत्ती झाली होती. त्यानंतर मात्र आलमट्टी धरणातील पाणीसाठा, पाण्याचा विसर्ग याकडे महाराष्ट्राकडून लक्ष ठेवले जाते. यंदा जून महिना कोरडा गेल्यामुळे आलमट्टीतील पाणीसाठा कमी झाला होता. शिवाय पाणीटंचाईची आहे. शक्यताही वर्तविली जात होती; पण १७ जुलैपासून जोरदार पाऊस सुरू झाला. आलमट्टीच्या पाणलोट क्षेत्रातही जोरदार पाऊस होत आहे. त्यामुळे आलमट्टीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे. २२ जुलै रोजीच्या आकडेवारीनुसार पाण्याची आवक (इनफ्लो) ८३ हजार ९४५ क्युसेक इतकी आहे.
यावेळी २२ जुलै रोजी ३६.१५ टक्के इतके भरले आहे. बेळगाव जिल्ह्यातील हिडकल जलाशय ३०.०८ टक्के इतके भरले.आलमट्टीच्या पाणलोट क्षेत्रातही जोरदार पाऊस होत आहे. त्यामुळे आलमट्टीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे. तर, हिडकल जलाशयाची क्षमता ५१ टीएमसी असून यंदा २२ जुलै रोजी जलाशयात १५.३४४ टीएमसी पाणीसाठा आहे. गतवर्षी २२ जुलै रोजी जलाशयात ३४.२३५ टीएमसी पाणीसाठा होता. गतवर्षीच्या तुलनेत यंदा सर्वच जलाशयांमधील पाणीसाठा कमी आहे; पण पावसाचा जोर कायम राहिला, तर धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होणार आहे. तरी २०१९ सालाप्रमाणे पूरपरिस्थिती पुन्हा उद्भवू शकते अशी शक्यता नाकारता येणार नाही.