बेंगळुरू : काही महिन्यांपूर्वी विजेचे दर वाढवण्यात आले होते. त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढीमुळे हैराण झालेल्या नागरिकांवर अधिक बोजा पडला होता.
नवीन वर्षासाठी राज्य सरकार विजेचे दर कमी करण्याचा विचार करत असल्याचे सांगण्यात येत आहे. या संदर्भात ऊर्जा विभागाचे मंत्री व्ही. सुनील कुमार यांनी वीज दरकपातीचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना विभागाला दिल्याचे सांगितले जाते.
मंत्र्यांच्या सूचनेनुसार सर्व एस्कॉम कंपन्यांनी ऊर्जा विभागाकडून वीज दर कपातीचा प्रस्ताव तयार करून केईआरसीकडे सादर केल्याचे बोलले जात आहे.
सादर केलेल्या प्रस्तावात वीज वापरकर्ता शुल्क कमी करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. हे शुल्क 70 पैशांवरून 2 रुपये प्रति युनिट करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. हा प्रस्ताव सर्व एस्कॉमने केईआरसीकडे सादर केला असून त्यावर निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.