spot_img
spot_img
spot_img
27.1 C
Belagavi
Friday, December 1, 2023
spot_img
spot_img

हॉकी बेळगाव-यश इव्हेंटस पुरस्कृत हॉकी प्रशिक्षण शिबिरास प्रारंभ

बेळगाव / प्रतिनिधी हॉकी खेळाची क्रेझ आणि उत्साह बेळगावने जागतिक स्तरावर नेऊन ठेवला आहे असून हॉकीसाठी असलेली ही ख्याती पुन्हा मिळविण्यासाठी आणि तरुणांनी केवळ हॉकी खेळण्यासाठीच नव्हे तर शारीरिक दृष्ट्या तंदुरुस्त होण्यासाठी युवक युवतींना पुढे यावे असे आवाहन उद्यमबाग पोलीस निरीक्षक आर एस बिरादार यांनी केले. ते हॉकी बेळगाव आयोजित मोफत हॉकी प्रशिक्षण शिबिर उद्घाटन प्रसंगात बोलत होते.

हॉकी प्रशिक्षणार्थीना टी शर्ट देताना पोलीस निरीक्षक आर एस बिरादार, घुळाप्पा होसमनी, सुधाकर चाळके, धनंजय पटेल, प्रकाश कालकुंद्रीकर आदी

अध्यक्षस्थानी घुळाप्पा होसमनी होते. प्रारंभी प्रकाश कालकुंद्रीकर यांनी शिबिराचे प्रास्ताविक व माहिती सांगितली. सचीव सुधाकर चाळके यांनी प्रशिक्षणार्थीना खास मार्गदर्शन केले.
माजी हवाईदल अधिकारी देवीकांत बिर्जे यांनी प्रशिक्षणार्थीना व्यायाम व खेळांचे महत्व पटवून दिले. बीडीएचए अध्यक्ष धनंजय पटेल यांनी बेळगांवमधील हाॅकीपटूंची माहिती सांगितली. घुळाप्पा होसमनी यांनी प्रशिक्षणार्थीना हॉकी प्रशिक्षण शिबिरासाठी १० हजार रुपयांची बक्षिसे जाहीर केली.

हॉकी प्रशिक्षणार्थीसह पोलीस निरीक्षक आर एस बिरादार, घुळाप्पा होसमनी, सुधाकर चाळके, धनंजय पटेल, प्रकाश कालकुंद्रीकर आदी

हॉकी प्रशिक्षण शिबिरात सुमारे २५ जणांनी सहभाग घेतला आहे. आणखी ज्यांना सहभाग घ्यावयाचा आहे त्यांनी लेले मैदानावर संपर्क साधावा. हॉकी प्रशिक्षण शिबिर यश इव्हेंटसचे संचालक अजिंक्य कालकुंद्रीकर यांनी पुरस्कृत केले आहे.
यावेळी साई श्रध्दा महिला कल्याण संस्थेच्या अध्यक्षा सविता हेब्बार, आशा होसमनी, श्रीकांत आजगांवकर, मनोहर पाटील, उत्तम शिंदे, संजय शिंदे, गोपाळ खांडे, नामदेव सावंत, बाजीराव शिंदे, बसवराज बडची, प्रशांत मंकाळे, विनोद पाटील, धारू चाळके, संतोष दरेकर, अवधूत तुडवेकर आदी उपस्थित होते.
हॉकी प्रशिक्षण शिबिर सुभाषचंद्र बोस (लेले मैदान) टिळकवाडी येथे रविवार वगळता १५ एप्रिल ते १९ मे २०२३ पर्यंत दररोज सकाळी ६.३० ते ८.३० आणि संध्याकाळी ४ ते ६ या वेळेत हे प्रशिक्षण शिबिर होणार आहे.

Related News

नोबेल पारितोषिक विजेते अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन यांचं निधन

नवी दिल्ली : प्रतिष्ठेचा नोबेल पारितोषिक विजेते भारतीय अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन यांचं निधन झालं असून वयाच्या ८९ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

पाच राज्यांच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर; मतदान कधी आणि निकाल कधी लागणार जाणून घ्या

नवी दिल्ली- पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेत याबाबत माहिती देण्यात आली आहे.  मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड,...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisement -spot_img

Latest News

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img