बेळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टी अधिकृत उमेदवार नागेश मनोळकर यांच्या प्रचारार्थ आज माजी पालकमंत्री श्री. रमेश अण्णा जारकीहोळी यांचा झंझावाती प्रचार दौरा पार पडला.
यावेळी बडस, गजपती, कुकडोली, भेंडीगेरी, हलगीमर्डि, के.के.कोप्प, नागेरहाळ, बडाल अंकलगी, हुलिकावी गावामध्ये भव्य प्रचारफेरी काढण्यात आली.
पदयात्रेला स्थानिक नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. जागोजागी महिलांनी फुलांचा वर्षात तसेच औक्षण करत स्वागत केले. सर्व गावांमध्ये संपूर्ण वातावरण भाजपमय झाले आहे. या भागातील प्रत्येक प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याची ग्वाही यावेळी रमेश जारकीहोळी यांनी दिली.
या पदयात्रेत भाजप बेळगाव ग्रामीण जिल्हा अध्यक्ष श्री संजय पाटील, बीजेपी बेळगाव ग्रामीण मंडळ अध्यक्ष श्री धनंजय जाधव व निवडणूक निरीक्षक किरण जाधव तसेच पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.