spot_img
spot_img
spot_img
29.1 C
Belagavi
Friday, December 1, 2023
spot_img
spot_img

आंतरजातीय विवाह करण्यार तर लखपती होणार; सरकारची नवीन योजना

Inter-caste marriage promotion scheme: विविध गोष्टींना पाठिंबा देण्यासाठी सरकारकडून अनेक योजना राबवल्या जात असतात. अशीच एक योजना सरकारकडून राबविली जात आहे. ज्यामध्ये विवाहित जोडप्यांना लखपती करू शकते.

समानतेचा अधिकारासाठी आणि देशातील भेदभाव दूर करण्यासाठी सरकारकडून ही योजना राबविली जात आहे. ही योजना आंतरजातीय विवाह प्रमोशन योजना असून, यामध्ये विवाहितांना 2.50 लाख रुपयापर्यंतची रक्कम दिली जाते.

कोणाला मिळणार योजनेचा लाभ :

आंतरजातीय विवाह प्रोत्साहन योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे विवाह प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. या योजनेचा लाभ केवळ ज्यांनी आंतरजातीय विवाह केला आहे त्यांनाच घेता येणार आहे. जर एखादी व्यक्ती सर्वसाधारण वर्गातील असेल आणि त्याने इतर कोणत्याही समाजातील व्यक्तीशी लग्न केले असेल तर त्याला या योजनेचा लाभ घेता येईल.

या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी हिंदू विवाह कायदा 1955 अन्वये विवाहानंतर एक वर्षाच्या आत नोंदणी करणे आवश्यक आहे. दुसरा विवाह करणाऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. या योजनेचा लाभ घेताना चुकीची माहिती देणाऱ्या व्यक्तींवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. जर तुम्ही केंद्र आणि राज्याच्या इतर सरकारी योजनांचा लाभ घेतला असेल, तर ती रक्कम तुमच्याकडून या योजनेअंतर्गत कापली जाईल.

अर्ज कसा कराव 

या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या भागातील आमदार आणि खासदारांकडे जाऊन या योजनेसाठी अर्ज करता येईल. त्यानंतर हा अर्ज डॉ. आंबेडकर फाउंडेशनकडे पाठवला जाईल. आमदार खासदारांशिवाय तुम्ही या योजनेअंतर्गत फॉर्म भरून राज्य सरकार आणि जिल्हा कार्यालयातही जमा करू शकता.

आवश्यक कागदपत्रे

या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही कागदपत्रांचीदेखील पुर्तता करावी लागणार आहे. यासाठी तुम्हाला अर्जासोबत जातीचे प्रमाणपत्र. विवाह पमाणपत्र, लग्न झाल्याचे प्रतिज्ञापत्रही जोडावे लागेल. त्याशिवाय हे लग्न तुमचे पहिले लग्न आहे यासाठी एक प्रुफही द्यावे लागेल. तसेच पती-पत्नीला उत्पन्नाचा दाखला देणे बंधनकारक आहे. पैसे जमा होण्यासाठी बँकेतील जॉइंट खात्याचा तपशीलही द्यावा लागणार आहे. सर्व गोष्टींची शहानिशा झाल्यानंतर आणि अर्ज मंजूर झाल्यानंतर पती-पत्नीच्या खात्यात दीड लाख जमा केले जातील तर, उर्वरीत एक लाख रुपयांची एफडी केली जाईल.

Related News

नोबेल पारितोषिक विजेते अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन यांचं निधन

नवी दिल्ली : प्रतिष्ठेचा नोबेल पारितोषिक विजेते भारतीय अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन यांचं निधन झालं असून वयाच्या ८९ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

पाच राज्यांच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर; मतदान कधी आणि निकाल कधी लागणार जाणून घ्या

नवी दिल्ली- पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेत याबाबत माहिती देण्यात आली आहे.  मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड,...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisement -spot_img

Latest News

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img