आज शारदीय नवरात्रीचा सहावा दिवस आहे. आजच्या दिवशी देवी कात्यायनीची पूजा-आराधना केली जाते. कात्यायनी देवीच्या उपासनेने सर्वप्रकारच्या मनोकामना पूर्ण होतात.
देवी कात्यायनीचे रूप अत्यंत सुंदर असून ती सिंहावर विराजमान आहे. देवीला चार हात असून एका हातात तलवार तर दुसऱ्या हाताने देवी आपल्या भक्तांना आशिर्वाद देत आहे.