Gadar 2 Official Trailer : बहुप्रतिक्षित चित्रपट ‘गदर 2’ चा धमाकेदार ट्रेलर 26 जुलै 2023 रोजी संध्याकाळी 7:30 वाजता रिलीज झाला. आता चाहते चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक आहेत. विशेष म्हणजे, या चित्रपटात पुन्हा एकदा अमिषा पटेल आणि सनी देओलची रोमँटिक जोडी पाहायला मिळणार आहे.
या चित्रपटाचा टीझर आधीच रिलीज झाला होता, त्यानंतर त्याची काही गाणीही रिलीज करण्यात आली होती. त्यानंतर आता सनी पाजीने ‘गदर 2’ चा ट्रेलर रिलीज करुन पुन्हा एकदा खळबळ उडवून दिली आहे. चित्रपटाचा ट्रेलर रिलीज होताच सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. ‘गदर 2’ हा चित्रपट 11 ऑगस्ट 2023 रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. आता हा चित्रपट पाहण्याची चाहत्यांची उत्सुकता आणखीनच वाढली आहे.
गदर 2′ चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये, सनी देओल उर्फ तारा सिंगने त्याच्या अॅक्शनपट सीनने चाहत्यांना आकर्षित केले आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये अनेक अॅक्शन सीन्स आणि दमदार डॉयलॉग आहेत. विशेष म्हणजे, डॉयलॉगही गदर चित्रपटाची शान आहेत. चित्रपटाच्या टीझरमध्ये अमिषा पटेल गायब होती, मात्र आता ट्रेलरमध्ये अमिषाची झलक पाहायला मिळत आहे. सनी आणि अमिषा यांची रोमँटिक केमिस्ट्रीही चाहत्यांच्या पसंतीस उतरली आहे.
या चित्रपटाचा पहिला भाग 2001 मध्ये रिलीज झाला होता, जो ऑलटाइम फेमस चित्रपटांच्या यादीत आहे. गदरच्या पार्ट 1 मध्ये सनी देओल, अमिषा पटेल आणि उत्कर्ष शर्मा मुख्य भूमिकेत होते. ‘गदर 2′ आता 11 ऑगस्टला थिएटरमध्ये रिलीज होत आहे. तरी पहायला विसरू नका’ गदर-2′.