बेळगाव : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने 234 नवीन शहरांमध्ये 730 चॅनेल्ससाठी चढत्या ई-लिलावाच्या तिसऱ्या बॅचचे आयोजन करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली असून, खाजगी एफएम रेडिओ फेज थ्री ची पॉलिसी अंतर्गत अंदाजे आरक्षित किंमत 784.87 कोटी रुपये आहे. ज्यामध्ये बेळगावला 4 वाहिन्यांचे वाटप करण्यात आले आहे. गेल्या 2011 पासून बेळगावसाठी 4 चॅनेल्ससाठी एकच कथा ती म्हणजे त्यांना अजिबात बोली नाही.
वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) वगळून एकूण महसुलाच्या 4 टक्के म्हणून एफएम चॅनेलचे वार्षिक परवाना शुल्क (एएलएफ) आकारण्याच्या प्रस्तावालाही मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.
हे देशातील 234 नवीन शहरे/नगरांसाठी लागू होईल. सदर 234 नवीन शहरे/नगरांमध्ये खाजगी एफएम रेडिओ रोलआउट होऊन या शहरा/नगरांमधील एफएम रेडिओची अपुरी मागणी पूर्ण करेल. ज्याची अजूनही खाजगी एफएम रेडिओ प्रसारणाद्वारे पूर्तता झाली नव्हती आणि तेथे मातृभाषेत नवीन/स्थानिक सामग्री आणली जाईल.
यामुळे रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील. स्थानिक बोली आणि संस्कृतीला चालना मिळेल आणि ‘स्थानिकांसाठी आवाज’ उपक्रम सुरू होतील. अनेक मंजूर शहरे/नगरे ही आकांक्षी जिल्हे आणि एलडब्ल्यूई प्रभावित भागात आहेत. या भागात खाजगी एफएम रेडिओची स्थापना केल्याने या क्षेत्रांमध्ये सरकारची पोहोच आणखी मजबूत होईल.