बेळगाव : बेळगाव येथे 9 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनाला उपस्थित राज्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची माजी आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनी भेट घेतली आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत ही केले.
ताईंनी आपल्या ५ वर्षाच्या आमदारकीच्या काळात व तदनंतर सुद्धा जर राजकारणांत काय कमावले असेल तर तो लहान मोठ्या राजकीय नेत्यांकडून मिळतं असलेला सन्मान …आपल्या ५ वर्षांच्या आमदारकीच्या कार्यकाळात जेवढा जमेल एवढा तालुक्यात विकास केला म्हणूनच लोकांना आता फरक जाणवायला लागला आहे पुढे पण अजून जास्त जाणवेल.
काल बेळगाव विमानतळावर राज्याचे पंचायतराज व ग्रामीण विकास मंत्री सन्माननीय प्रियांक खर्गे साहेब यांनी अचानक ताईंना असा वाकून नमस्कार केला नंतर ताईंनी सुद्धा नमस्कार केला… हा सन्मान मोठा म्हणावा लागेल!
कारण पक्षसंघटना जे जे काम ताईंना देईल ते ते काम ताई प्रामाणिक पणे पार पडतं असतात हे पक्ष लेवल ला सगळेजण जाणतात.