spot_img
spot_img
spot_img
27.1 C
Belagavi
Monday, December 4, 2023
spot_img
spot_img

अखेर सिद्धरामय्या पुन्हा मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर विराजमान

बेळगाव : 10 मे रोजी झालेल्या कर्नाटक विधान सभेच्या निवडणुकीत काँग्रेसचा एकहाती विजय झाला असून सिद्धरामय्या पुन्हा मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर विराजमान झाले आहेत.सिद्धरमय्या यांच्या सोबत डी. के. शिव कुमार हे मुख्यमंत्री पदासाठी दावेदार होते.अखेर सिद्धरमय्या यांच्या नावावर काँग्रेसने कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून शिक्कामोर्तब केले.सिद्धरमय्या १९८३ साली पहिल्यांदा अपक्ष उमेदवार म्हणून कर्नाटक विधानसभेत निवडून आले. १९९४ मध्ये जनता दल सरकारमध्ये कर्नाटकचे उपमुख्यमंत्री झाले. एच. डी. देवेगौडा यांच्यासोबत वाद झाल्यानंतर जनता दल सेक्युअरची साथ सोडली. २००८ मध्ये काँग्रेसचा हात पकडला.

सिद्धरमय्या २०१३ ते २०१८ पर्यंत राज्याचे मुख्यमंत्री होते. आतापर्यंत त्यांनी १२ निवडणुका लढल्या. त्यापैकी नऊ निवडणुकांमध्ये जिंकले. सात किलो अन्न देणारी भाग्य योजना, शाळेत जाणाऱ्या मुलांना १५० ग्राम दूध आणि इंदिरा कँटीन या त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळातील महत्त्वाच्या योजना आहेत.

सिद्धरमय्या यांचा जन्म तीन ऑगस्ट १९४७ रोजी म्हैसूर येथे झाला. तेव्हा ब्रिटीशांचे राज्य होते. त्यांचे वडील म्हैसूर जिल्ह्यात के. टी. नरसीपुराजवळ शेती करत होते. आई बोरम्मा गृहिणी होती.

दहा वर्षांपर्यंत त्यांनी शिक्षण घेतले नव्हते. बीएसस्सी आणि एलएलबी त्यांनी म्हैसूर विद्यापीठातून केली. पाच भाऊ-बहिणींमध्ये सिद्धरमय्या हे दुसऱ्या क्रमांकाचे. ते कुरुबा गौडा समाजाचे आहेत. सिद्धरमय्या म्हैसूरचे वकील चिक्काबोरय्याचे ज्युनिअर होते. काही दिवस त्यांनी कायद्याचे शिक्षण दिले.

Related News

नोबेल पारितोषिक विजेते अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन यांचं निधन

नवी दिल्ली : प्रतिष्ठेचा नोबेल पारितोषिक विजेते भारतीय अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन यांचं निधन झालं असून वयाच्या ८९ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

पाच राज्यांच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर; मतदान कधी आणि निकाल कधी लागणार जाणून घ्या

नवी दिल्ली- पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेत याबाबत माहिती देण्यात आली आहे.  मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड,...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisement -spot_img

Latest News

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img