बहुचर्चित काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेला आज कर्नाटकातील मंड्या जिल्ह्यापासून सुरुवात झाली. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी या राहुल गांधी यांच्याबरोबर भारत जोडो पदयात्रेमध्ये सहभागी झाल्या.
सोनिया गांधी या न्यामनहळी गावापासून पदयात्रेमध्ये राहुल गांधी यांच्याबरोबर बारा मिनिटा पर्यंत सामील झाल्या; त्यांच्याबरोबर कर्नाटका प्रदेश काँग्रेस अध्यक्ष डी. के. शिवकुमार, विरोध पक्ष नेते सिद्धरामय्या, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते के .सी. वेणू गोपाल, खानापूर आमदार अंजली निंबाळकर आणि बेळगाव ग्रामीण क्षेत्राच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर आणि तमाम काँग्रेसचे कार्यकर्ते पदयात्रेमध्ये सहभागी झालेत.
आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सोनिया गांधी यांचे पदयात्रेत स्वागत केले. या पदयात्रेला पोलीस बंदोबस्त आणि सुरक्षा प्रदान करण्यात आली असून त्याबरोबरचं लाखो जनही या यात्रेमध्ये सहभागी झाले आहेत.