आज दिनांक 29/07/2023 रोजी के.के कोप्प ग्राम पंचायत अध्यक्ष पदाची निवडणूक संपन्न झाली, अध्यक्षपदी सौ. शोभा सोमशेखर दनदमनी यांची निवड झाली आहे. या विजयाने ग्राम पंचायत वरील भारतीय जनता पार्टीचे वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
विजय झाल्यानंतर नूतन अध्यक्ष यांनी भाजपा बेळगाव ग्रामीण मंडळ कार्यालयल विजय नगर येथे सदिच्छा भेट दिली याप्रसंगी भाजपा बेळगाव ग्रामीण मंडळ अध्यक्ष श्री धनंजय जाधव यांनी अध्यक्ष यांचा शाल व बुके देऊन सत्कार केला व पुढील राजकीय वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या, कोणत्याही राजकीय दडपणाला व अमिषाला बळी न पडता के.के कोप्प ग्राम पंचायत हा बालेकिल्ला भाजपाने अभाधित ठेवल्या बद्दल सर्व ग्राम पंचायत सदस्य व कार्यकर्त्यांचे मनापासून आभार मानले.
या प्रसंगी के.के कोप्प ग्राम पंचायत सदस्य, प्रमुख कार्यकर्ते तसेच शेखर शि. पाटील, शंतेश ब. नंदिहल्ली, संजय करेन्नवर, भीम कांग्राळी, सावित्री हुडेद, सुरेश घोरपडे, मिथील जाधव, अजित हलकर्णी, यल्लापा हेब्बाळकर , बुधाजी पाटील मंथन सुतार, आदीसह सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.