spot_img
spot_img
spot_img
21.3 C
Belagavi
Sunday, October 1, 2023
spot_img
spot_img

जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांना अटक; बँकेची ५३८ कोटींची फसवणूक प्रकरणी EDची कारवाई

नवी दिल्ली : जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांना अटक करण्यात आली आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी गोयल यांना अटक करण्यात आली आहे. कॅनराला बॅकेकडून घेण्यात आलेल्या ५३८ कोटी रुपयांच्या घोटाळ्या प्रकरणी ईडीने त्यांची चौकशी केली होती. या चौकशीनंतर गोयल यांना अटक करण्यात आली आहे. हे प्रकरण ५३८ कोटी रुपयांच्या कॅनरा बँकेतील घोटाळ्याशी संबंधित आहे. या प्रकरणी ईडीने कारवाई केली आणि जेट एअरवेजचे संस्थापक गोयल यांना अटक केली.

आज शनिवारी  गोयल यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी गोयल यांची ईडीने अनेक तास चौकशी केली होती. ईडीने कॅनरा बँकेच्या तक्रारीनंतर गोयल, अनीता गोयल, आनंद शेट्टी आणि जेट एअरवेज इंडिया लिमिटेडविरुद्ध ५३८ कोटी रुपयांच्या फसवणुकीचा नवा गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी जुलै २०२३ मध्ये गोयल आणि जेट एअरवेजच्या अनेक ठिकाणांवर छापे देखील टाकण्यात आले होते.

काय आहे संपूर्ण प्रकरण

बंद पडलेल्या जेट एअरवेजचे नरेश गोयल हे प्रमोटर होते. गोयल यांच्यासह काही जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या महिन्यात मुंबई आणि दिल्लीत ८ ठिकाणी छापे टाकण्यात आले होते. ५३८ कोटी रुपयांच्या बँक घोटाळ्यात आता त्यांच्या अडचणी अजून वाढत चालल्या आहेत. ईडीने गोयल, त्यांची पत्नी अनीता तसेच जेटचे डायरेक्टर गौरंग आनंद शेट्टी यांना आरोपी ठरवण्यात आले. ईडने कॅनरा बँकेच्या तक्रारीवरून नवा गुन्हा दाखल केला. त्याआधी फेब्रुवारी महिन्यात बॉम्बे उच्च न्यायालयाने गोयल आणि पत्नी यांना मोठा दिलासा दिला होता. तेव्हा कोर्टाने मनी लॉन्ड्रिंगचा खटला रद्द केला होता. पण कोर्टाने असे देखील म्हटले होते की जर नवा खटला समोर आला तर ईडी चौकशी करू शकते.
आता चौकशी झाल्यानंतर गोयल यांना अटक झाली. ईडीने दिलेल्या माहितीनुसार एक एप्रिल २०११ ते ३० जून २०१९ दरम्यान प्रोफेशनल आणि कंसल्टेन्सी खर्च म्हणून ११५३.६२ कोटी खर्च केले. जेटशी संबंधित कंपन्यांचा १९७.५७ कोटीच्या व्यवहाराची चौकशी सुरू आहे. चौकशीत असे समोर आली की ११५२.६२ कोटी पैकी ४२०.४३ कोटी अशा कंपन्यांना दिले ज्यांचा सेवा देण्याशी काही संबंध नव्हता.

Related News

संपूर्ण समाज सरकारच्या पाठीशी आहे – लक्ष्मी हेब्बाळकर

बेंगळुरू : काँग्रेस पक्षाला सर्व समाजाचा पाठिंबा मिळाला आहे. केवळ एका समाजाच्या पाठिंब्याने सत्ता प्राप्त होत नाही. महिला व बालकल्याण विभागाच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर...

तुमच्या मालमत्तेच्या मूल्यांचे अवमूल्यन करू नका, वास्तविक मूल्यासाठी व्यापार करा

बेळगाव : कर्नाटक राज्य सरकारच्या स्थावर मालमत्ता मार्गदर्शक तत्त्वातील किंमत सुधारणा 1 ऑक्टोबर ते शेकडा 10% वरून 30% पर्यंत वाढ करण्याचा आदेश जारी करण्यात...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisement -spot_img

Latest News

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img