आदिवासी समाजाच्या द्रोपदी मुर्म या राष्ट्रपती झाल्याने शहरात मिठाई वाटून जल्लोष साजरा करण्यात आला. आज राष्ट्रपती निवडणूक निकाल जाहीर झाला असून दौपदी मुर्म या राष्ट्रपती पदावर रुजू झाले आहेत. आज झालेल्या मतमोजणीत इंडिया कडे असलेल्या खासदारांच्या संख्येपेक्षा जास्त मते द्रोपदी मुर्म यांना मिळाले आहेत.
आज द्रौपदी मुर्म या राष्ट्रपती झाल्याबद्दल शहरातील गॅंगवाडी मध्ये सर्वांनी विजय उत्सव साजरा केला यावेळी ढोल ताशा वाजवून जल्लोषी वातावरणात नागरिकांना मिठाईचे वाटप केले.
याप्रसंगी आमदार अनिल बेनके यांनी सुद्धा गॅंगवडी भागांमध्ये जाऊन सर्वांच्या आनंदात सहभागी झाले. यावेळी त्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्म यांच्या राजकीय प्रवासाचा आढावा घेतला.
यावेळी ते म्हणाले की देशासाठी आपले जीवन समर्पित करणाऱ्या आदिवासी समाजातील द्रौपदी मुर्म यांना राष्ट्रपती मिळाल्याने आता आनंद होत असल्याचे मत व्यक्त केले. द्रोपदी मुर्मया आमदार खासदार राज्यपाल पदी काम केले आहे तसेच त्यांचा राजकीय आणि सामाजिक प्रवास मोठा असल्याने त्यांची राष्ट्रपती निवड झाल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.