खानापूर : हिरेहट्टीहोळी येथे काही ग्रामस्थ व मेंबर गेले ३-४ दिवस झाले पंचायत समोर उपोषणाला बसले होते.
विषय होता रोड व गटर… थोडा जमिनीचा वाद वगैरे वगैरे …
ताईंना हा विषय समजताच ताईंनी आजच सकाळी तहसिलदार खानापूर यांना हिरेहट्टीहोळी येथे जाऊन उपोषणा संदर्भात चर्चा करून विषय मिटविण्यास सांगितले होते…. त्याप्रमाणे
आज हिरेहट्टीहोळी येथे तहसिलदार साहेब खानापूर, तालुका पंचायत ईओ, पीडीओ, पीएसआय खानापूर, तसेच ब्लॉक कॉंग्रेस अध्यक्ष महादेव कोळी, सुरेश भाऊ, संगाप्पा वाली, तोहीद चांदखन्नावर, अशोक अंगडी वगैरे सर्व कॉंग्रेस चे नेते मंड़ळी सुद्धा हिरेहट्टीहोळी येथे पोचले…
सर्व सरकारी अधिकाऱ्यांनी ज्या जागेचा वाद आहे किंवा जिथे रोड करायचा आहे त्या जागेवर जाऊन पहाणी केली व नंतर
उपोषण कर्त्यांसोबत गावात चर्चा करण्यासाठी सर्वजण पोचले,
तहसिलदार खानापूर यांनी सर्वांशी चर्चा केली, ग्रामपचंयात अध्यक्ष लावगी साहेब यांनी पण पंचायत ची बाजू सर्वासमोर मांडली….
शेवटी तहसिलदार यांनी सकारात्मक चर्चा घडवून विषय मार्गी लावून देतो असे सांगून उपोषण कर्त्यांची समजून काढली व शेवटी उपोषण मागे घेण्यात आले…
यावेळी ग्रामस्थ हिरेहट्टीहोळी, पंचायत चे मेंबर्स, पंचमंडळी, कॉंग्रेस चे पदाधिकारी, तसेच सर्व शासकीय अधिकारी उपस्थित होते..
ताई नेहमीच गावकर्यांसोबत असतात ताईंचा दृष्टिकोण सकारात्मक असतो गावात भाडंणतंटा होऊ नये गाव एकोप्याने रहावे हाच ताईंचा कायम प्रयत्न असतो.