भरतीय जनता पार्टी बेळगाव ग्रामीण मंडळ च्या वतीने, विधान परिषदेचे आमदार श्री हणमंत निराणी यांच्या अनुदानातून हिंडलगा मराठी प्राथमिक सरकारी शाळेला 4×10 फुट लांबी रुंदीचे 7 ग्रीन बोर्ड देण्यात आले. ह्या प्रसंगि बोलताना भाजपा बेळगाव ग्रामीण मंडळ अध्यक्ष श्री धनंजय जाधव म्हणाले.
भरतीय जनता पक्ष बेळगाव ग्रामीण मंडळच्या वतीने अनेक उपक्रम राबविले जात आहेत. प्रामुख्याने स्वच्छता मोहीम, मोफत आरोग्य तपासणी शिबीर, भारत माता CSC सेंटर च्या माध्यमातुन सरकारी कागदपत्रे व सरकारी योजना त्यांच्या गावामधे जाऊन उपलब्ध करून देणे, लंपी रोगापासून गो धन वाचविण्यासाठी औषध फवारणी मोहीम. कन्नड आणि मराठी शाळेला ग्रीन बोर्ड देण्याची योजना असे अनेक कार्यक्रम हाती घेण्यात आले आहेत.
विद्यार्थ्यांना उत्कृष्ठ दर्जाचे ग्रीन बोर्ड उपलब्ध करून देण्यात येत आहेत. विधान परिषद सदस्य श्री हणमंत निराणी यांच्या अनुदानातून हे कार्य सुरू करण्यात आले आहे. शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या मधला सेतू म्हणजे खडू आणि फळा. ज्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जाते.
विद्यार्थ्यांनी चांगले शिक्षक घ्यावे ह्याच उद्देशाने हे कार्य चालू आहे. असे ते म्हणाले. ग्राम पंचायत सदश्य श्री रामचंद्र मंनोळकर म्हणाले धनंजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली ग्रीन बोर्ड देण्याची कल्पना खूप चांगली आहे. यातून शाळेचे आधुनिकीकरण करण्यास सुरुवात होईल असे ते म्हणाले. ह्या प्रासंगि.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एस.
डि. एम. शि उपाध्यक्षा सौ. ज्योती मेनषे, ह्या होत्या. हिंडलगा ग्राम पंचायत उपाध्यक्षा सौ. भाग्यश्री कोकीतकर , विलास ताशीलदार, अजित हलकरणी, अरुण काळसेकर, गुरुराज हालगत्ती, अजय मुगापगोळ, आणील मद्यापगोळ, गणपत देसाई, आधी सह शाळेचे सर्व शिक्षक, शाळा सुधारणा समिती चे सदस्य उपस्थित होते.